बुलडोझर गॅरेजमध्ये ४९ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:20 AM2021-01-15T04:20:18+5:302021-01-15T04:20:18+5:30
कोल्हापूर : राधानगरी रोडवरील वाशी (ता. करवीर) येथील ज्ञानदेव उद्योग समूह नावाच्या बुलडोझरच्या गॅरेजमधील सुमारे ४९ हजार १०० रुपयांचे ...
कोल्हापूर : राधानगरी रोडवरील वाशी (ता. करवीर) येथील ज्ञानदेव उद्योग समूह नावाच्या बुलडोझरच्या गॅरेजमधील सुमारे ४९ हजार १०० रुपयांचे स्पेअर पार्ट व साहित्य अज्ञाताने चोरुन नेले. याबाबत पांडुरंग बाबुराव सुतार (५६ रा. राधानगरी रोड, खत कारखानानजीक, वाशी) यांनी करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पांडुरंग सुतार यांचे वाशी गावानजीक मुख्य रोडवर बुलडोझरचे गॅरेज आहे. बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या गॅरेजमधील बुलडोझरचे ५ रोल, १२ चेन प्लेटा, पोकलॅनच्या बकेटचे ५ दाते, ट्रॅक्टर-ट्रॉलीचे १८ कमानपाटे, एक ॲम्पीअरची एक इलेक्ट्रीक मोटर, १२ व्हॉल्टची एक बॅटरी, लहान-मोठ्या तीन हातोड्या असा एकूण सुमारे ४९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या चोरीची तक्रार सुतार यांनी करवीर पोलिसांत दिली.