सांगलीत कुरिअर कार्यालयात चोरी

By admin | Published: October 19, 2016 12:39 AM2016-10-19T00:39:25+5:302016-10-19T00:39:25+5:30

तीन लाखांचा ऐवज लंपास : बनावट चावीने कुलूप काढून डल्ला

Theft in Sangliat Kaur's office | सांगलीत कुरिअर कार्यालयात चोरी

सांगलीत कुरिअर कार्यालयात चोरी

Next

सांगली : येथील सराफ कट्ट्यावरील तिरुपती कुरिअर सर्व्हिसच्या बंद कार्यालयाचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी साठ हजारांचे सोन्याचे दागिने, दोन लाख साठ हजारांची रोकड असा तीन लाख २० हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी दुपारी तीन ते सायंकाळी पावणेपाच यादरम्यान चोरीची ही घटना घडली आहे. शहर पोलिसांनी चौकशी करून मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
तानवडे बुक सेलर्ससमोरील ‘सानिका भवन’मधील न्यू सराफ अपार्टमेंटमधील तळघरात तिरुपती कुरिअर सर्व्हिसचा गाळा आहे. नऊ कर्मचारी येथे नोकरीला आहेत. अविनाश भानुदास माने (वय २१, रा. फलटण, सध्या कोल्हापूर) याच्यासह सर्व कर्मचारी सोमवारी दुपारी तीन वाजता कार्यालयास कुलूप लावून पार्सल वितरणासाठी गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी बनावट चावीने कार्यालयाचे कुलूप काढून आत प्रवेश केला. आत कुरिअरची दोन पार्सल होती. यामध्ये साठ हजारांचे दागिने व दोन लाख ६० हजारांची रोकड होती. ही दोन्ही पार्सल घेऊन चोरट्यांनी शटर्स लावून पलायन केले. पावणेपाच वाजता अविनाश माने आला. त्यावेळी शटर्सचे कुलूप काढलेले दिसले. तो आत गेला असता, पार्सल विस्कटलेली नव्हती; पण दागिने व रोकड असलेली दोन पार्सल गायब असल्याचे दिसले. त्यानंतर सर्व कर्मचारी आल्यानंतर चौकशी केली; पण चोरीबद्दल कोणालाच माहिती नव्हती.
अविनाश मानेसह सर्व कर्मचारी रात्री नऊ वाजता शहर पोलिस ठाण्यात गेले व पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांना त्यांनी या घटनेची माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी ३२ लाखांचा ऐवज गेल्याची माहिती दिली, पण इतक्या मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेल्या ऐवजाबद्दल या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली.


कर्मचाऱ्यांची चौकशी
बनावट चावीने कुलूप काढून चोरी झाल्याने पोलिसांनी कुरिअरमधील नऊ कर्मचाऱ्यांना रात्रीच ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात स्वतंत्रपणे बसवून चौकशी केली जात आहे. सर्व कर्मचारी, पार्सल वितरणासाठी गेलो होतो, अशी माहिती देत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागही तपास करीत आहे. अजून कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

Web Title: Theft in Sangliat Kaur's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.