शहरात तीन दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:54+5:302020-12-29T04:22:54+5:30

कोल्हापूर : शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी दिवसभरात रंकाळा अंबाई टॅंक, महाराष्ट्रनगर, मध्यवर्ती बसस्थानक या ...

Theft of three bikes in the city | शहरात तीन दुचाकींची चोरी

शहरात तीन दुचाकींची चोरी

Next

कोल्हापूर : शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी दिवसभरात रंकाळा अंबाई टॅंक, महाराष्ट्रनगर, मध्यवर्ती बसस्थानक या तीन ठिकाणांहून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या. दुचाकी चोरीच्या रोज घटना घडू लागल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

प्रशांत बापूसाहेब माळी (४३, रा. युनिक पार्क, लिशा हॉटेलनजीक) यांनी रंकाळा तलाव परिसरातील अंबाई टॅंकनजीक उभ्या केलेल्या सुमारे ३० हजारांच्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली. त्याबाबत त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

मध्यवर्ती बसस्थानकनजीक पारीख पूल रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. याबाबत दुचाकी मालक दीपक अच्युतराव वैद्य (१८, रा. स्वामी समर्थ नगर, बाबा जरगनगर, पाचगाव) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कळंबानजीक महाराष्ट्र नगरमध्ये उभी केलेली सुमारे २२ हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्याची तक्रार दुचाकीमालक अनिल वसंतराव पवार (४८, रा. महाराष्ट्रनगर, कळंबा) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली.

Web Title: Theft of three bikes in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.