घरकामासाठी ठेवलेल्या परप्रांतीय दाम्पत्यानेच केली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 06:17 PM2021-03-18T18:17:16+5:302021-03-18T18:19:24+5:30
CrimeNews Police Kolhapur- हेल्पर कम कुक म्हणून घरकामाला ठेवलेल्या परप्रांतीय दाम्पत्यानेच घरातील सोन्याची कर्णफुले व मोबाईल घेऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली. न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती पार्कमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी सुमन महेंद्रकुमार शर्मा (वय ५३, रा. न्यू पॅलेस परिसर) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, सुमारे ४९ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे म्हटले आहे.
कोल्हापूर : हेल्पर कम कुक म्हणून घरकामाला ठेवलेल्या परप्रांतीय दाम्पत्यानेच घरातील सोन्याची कर्णफुले व मोबाईल घेऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली. न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती पार्कमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी सुमन महेंद्रकुमार शर्मा (वय ५३, रा. न्यू पॅलेस परिसर) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, सुमारे ४९ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे म्हटले आहे.
सुमन शर्मा या छत्रपती पार्कमध्ये सहकुटुंब राहतात. त्यांच्या घरी जीवन सुबेदी (वय ३८) व कविता देवी (२८, दोघेही मूळ रा. लालपुखूरी भीमारी, आसाम) हे परप्रांतीय दाम्पत्य हेल्पर कम कुक म्हणून काही महिने घरकामासाठी होते.
शर्मा कुटुंबीय हे घराबाहेर गेले असताना या परप्रांतीय दाम्पत्याने त्यांच्या घरातील लाकडी कपाटात ठेवलेली सोन्याची कर्णफुले व वापरण्यासाठी दिलेला मोबाईल घेऊन पलायन केले. सुमारे ४९ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची तक्रार शर्मा यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली आहे.