... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:51 PM2019-01-11T12:51:02+5:302019-01-11T12:53:45+5:30

सरकार मुर्दाड झाले आहे, अर्ज-विनंत्यांची भाषा त्यांना कळत नाही. त्यांचे देव असलेले अमित शहा २४ रोजी कोल्हापुरात येत आहेत. हा दौरा सुरळीत पार पडावा, असे सरकारला वाटत असेल तर दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थकीत उस आणि विजेच्या बिलांचा हिशेब द्यावा; नाही तर मुख्यमंत्र्यांसह येणाऱ्या अमित शहांना कोल्हापुरात पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

By then, Amit will not let the prints step in Kolhapur: Raju Shetty | ... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही : राजू शेट्टी

... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही : राजू शेट्टी

Next
ठळक मुद्दे... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाहीखासदार राजू शेट्टींचा इशारा: ऊस आणि विजेचा बिलांचा हिशेब पूर्ण करा

कोल्हापूर : सरकार मुर्दाड झाले आहे, अर्ज-विनंत्यांची भाषा त्यांना कळत नाही. त्यांचे देव असलेले अमित शहा २४ रोजी कोल्हापुरात येत आहेत. हा दौरा सुरळीत पार पडावा, असे सरकारला वाटत असेल तर दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थकीत उस आणि विजेच्या बिलांचा हिशेब द्यावा; नाही तर मुख्यमंत्र्यांसह येणाऱ्या अमित शहांना कोल्हापुरात पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचा सर्वपक्षीय शेतकरी मेळावा गुरुवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला. मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार शेट्टी म्हणाले, सरकारने आतापर्यंत किती वेळा आश्वासने दिली आणि किती वेळा मोडली याची मोजदाद करणे आम्ही सोडून दिले आहे.

शेतकऱ्यांविषयी नुसता खेळखंडोबा सुरू असल्यानेच रस्त्यावर उतरावे लागत आहे. उसाच्या एफआरपीत २०० रुपयांची वाढ झाल्याचे सांगणारे सरकार एफआरपीचा बेस वाढवून शेतकऱ्यांची फसवणूक करते. हेच सरकार एफआरपी अधिक २०० रुपये पहिली उचल देऊ म्हणते आणि प्रत्यक्ष देण्याची वेळ आल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते.

विजेच्या बाबतीतही गेली साडेचार वर्षे नुसतीच आश्वासने दिली जात आहेत. सत्यशोधन समितीचा अहवाल स्वीकारण्याचे नैतिक धाडसही सरकारकडे राहिलेले नाही. वीज थकबाकीची किती रक्कम शेतकरी देणे लागतो आणि सरकार किती याचा हिशेब द्या, ते जमत नसेल तर शेतकऱ्यांकडे पैसे मागण्याचा नैतिक अधिकारही ‘महावितरण’ला राहिलेला नाही.

२१ चे चक्का जाम आंदोलन ताकदीने करा

वीज व एस.टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सरकार हतबल होते. मग शेतकरी इतके वेळा रस्त्यावर उतरतात, तरीही सरकार का हतबल होत नाही, याचा शेतकऱ्यांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्यात मेळ नसल्यानेच सरकार त्याचा गैरफायदा उठवीत आहे. हे होऊ द्यायचे नसेल तर २१ रोजीच्या कोल्हापुरात पंचगंगा पुलावरील महामार्गावर चक्का जाम आंदोलनात ताकदीने उतरा, असे आवाहन खासदार शेट्टी यांनी केले.

सरकार आहे की दलाल?

विजेच्या विक्रीदरात भराभर वाढ होत असताना कारखान्यांनी तयार केलेल्या विजेचे खरेदीदर मात्र कमी होत आहेत, यामागचे गौडबंगाल काय, अशी विचारणा करीत खासदार शेट्टी यांनी कमी दराने वीज घेऊन ती जास्त दराने विकणारे हे सरकार आहे की दलाल, हे आधी सरकारने जाहीर करावे, असे खुले आव्हान दिले. शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडणाऱ्यांनी वीजचोऱ्या करणाऱ्यांना आधी पकडावे. वीजचोऱ्या करणारेच आमदार आणि मंत्रीही झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
 

 

Web Title: By then, Amit will not let the prints step in Kolhapur: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.