...मग मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजा चालते का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:44+5:302021-07-15T04:17:44+5:30
म्हाकवे : राज्यात दारू दुकाने, सर्व बाजारहाट, निवडणुका सुरू असताना पायी वारीबाबत घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. कोरोनाचे संकट लक्षात ...
म्हाकवे : राज्यात दारू दुकाने, सर्व बाजारहाट, निवडणुका सुरू असताना पायी वारीबाबत घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन ५ लाखांऐवजी केवळ १०० वारकऱ्यांनी पायी वारीची परवानगी मागितली होती. मात्र, तिही धुडकावून लावण्यात आली. मग आषाढीच्या शासकीय विठ्ठल महापूजेचा मुखमंत्र्यांना नैतिक अधिकार आहे का? वारी चालत नसेल तर तुम्हाला पूजा कशी चालते? असा थेट सवाल करत वारकऱ्यांनी कागल तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे निषेध नोंदवला तसेच,अध्यत्मिक कार्यक्रमांवरील निर्बंध उठवावेत, अशी मागणीही करण्यात आली.
वारकरी परंपरेने लोकजीवनात संस्कार शालिनता व समता रूजवली आहे. या भेदाभेदविरहित संप्रदायाच्या वाटचालीत पायी वारी सोहळ्याचे महत्त्व आहे. यावेळी ह.भ.प. दत्तात्रय खराडे(कौलगे),दीपक मुळे(सोनगे),मारुती कदम(हमीदवाडा),अमर माळी,मधुकर भोसले (बस्तवडे) आदी वारकरी उपस्थित होते. निवडणूक नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी यांनी हे निवेदन स्वीकारले.