...तर कोल्हापुरी चप्पलची निर्यात वाढेल : फाईव्ह स्टार हॉटेलशी करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:14 PM2020-08-29T13:14:03+5:302020-08-29T13:27:20+5:30
फाईव्ह स्टार हॉटेलशी करार करून त्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास चप्पल व्यवसायाची निर्यात वाढेल, अशी संकल्पना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मांडली. त्यांनी ही संकल्पना ट्ट्विरवर शेअर केली.
कोल्हापूर : फाईव्ह स्टार हॉटेलशी करार करून त्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास चप्पल व्यवसायाची निर्यात वाढेल, अशी संकल्पना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मांडली. त्यांनी ही संकल्पना ट्ट्विरवर शेअर केली.
कोल्हापुरी चप्पल व्यवसायातील निर्यात वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्याची गरज आहे. जर विविध फाईव्ह स्टार हॉटेलशी करार करून त्या ठिकाणी हे चप्पल विक्रीसाठी उपलब्ध करावे. तेथील ग्राहकांसाठी त्याची रूम सर्व्हिस द्यावी, ही संकल्पना यशस्वीपणे राबविल्यास या व्यवसायाची निर्यात ७५०० कोटींपर्यंत जाईल, अशी मत त्यांनी मांडले आहे.
Exports worth Rs 7,500 crores can be done by selling Kolhapuri slippers. We need innovative ideas like we can have agreements with five-star hotels & ask them to keep it in almirah of their rooms. If anybody likes, they can purchase it from there: Union Minister Piyush Goyal pic.twitter.com/bGgfhKVgM3
— ANI (@ANI) August 28, 2020
त्यांच्या संकल्पनेच्या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. दरम्यान, केंद्रीय मंत्री गोयल यांनी मांडलेली संकल्पना चांगली आहे. मात्र, त्यासाठी चप्पल उत्पादक आणि फाईव्ह स्टार हॉटेल यांच्यातील करार आणि विक्रीची पुढील व्यवस्था करण्यासाठी सरकारने स्वतंत्र संस्था नियुक्त करून कार्यवाही करणे आवश्यक ठरणार असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी व्यक्त केली.