... तेव्हा एक-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले, माजी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 08:19 AM2021-12-13T08:19:57+5:302021-12-13T08:21:50+5:30

आमदार विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी जवळपास पंधरा वर्षापूर्वी महापालिकेतील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते

... then gave 35 lakhs to a single corporator, a clear confession of the former minister Vinay Kore in kolhapur | ... तेव्हा एक-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले, माजी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

... तेव्हा एक-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले, माजी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

googlenewsNext
ठळक मुद्देजनसामान्यांच्या मनात राजकारणाबद्दल तिरस्कार होईल, असे राजकारण बंद केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.   

कोल्हापूर - जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी धक्कादायक कबुली दिली आहे. कोल्हापुरात पक्षाचा महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला चक्क 35-35 लाख रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, लोकांचा माझ्याबद्दल पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती, अशी कबुलीच कोरेंनी दिली. तसेच, जनसामान्यांच्या मनात राजकारणाबद्दल तिरस्कार होईल, असे राजकारण बंद केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.   

आमदार विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी जवळपास पंधरा वर्षापूर्वी महापालिकेतील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यावेळी, नगरसेवकांना आपल्याकडे खेचून महाडिकांची महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणली होती. 'काही वर्षांपूर्वी महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील एकत्र होते. तर, मी आणि हसन मुश्रीफ एकत्र होतो. त्यावेळी कोल्हापुरात महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले होते. माझ्या पक्षाचा महापौर झाला. मात्र, लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भावनेच्या भरात मी केलेली ही सर्वात मोठी चुक होती, अशी कबुलीच कोरे यांनी पत्रकारांसमोर दिली. कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. 

कोल्हापूरातील वडगाव बाजार समिती निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू असून बड्या नेत्यांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेण्यात आली होती.  
 

Web Title: ... then gave 35 lakhs to a single corporator, a clear confession of the former minister Vinay Kore in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.