...तर ‘केएमटी’चा पगार आज होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2016 01:03 AM2016-07-25T01:03:27+5:302016-07-25T01:03:27+5:30

अनुदानावर भिस्त : थकीत रक्कम ७२ लाख

... then the 'KMT' salary will be today | ...तर ‘केएमटी’चा पगार आज होणार

...तर ‘केएमटी’चा पगार आज होणार

Next

कोल्हापूर : ‘केएमटी’ कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत पगार देण्याचा निर्णय प्रशासनाने मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतल्याने कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्यात आला होता; पण महापालिकेकडून आज, सोमवारी विशेष अनुदानाची रक्कम मिळाल्यास कायम चालक व वाहकांचा सुमारे ७२ लाख रुपये जून महिन्याचा थकीत पगार देण्यात येणार असल्याचे ‘केएमटी’ प्रशासनाने सांगितले.
पगाराच्या रकमेपोटी ‘केएमटी’ प्रशासनाने महानगरपालिकेकडे सुमारे एक कोटी रुपये विशेष अनुदान मिळावे, अशी मागणी केली होती. ती मागणी महासभेत मान्य करण्यात आली. मंगळवारपासून शनिवारपर्यंत मिळणाऱ्या रोजच्या उत्पन्नातून सुमारे ३८ लाख रुपये काही कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केले. त्यामध्ये हंगामी कर्मचाऱ्यांचे १६ लाख रुपये व वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांचे २२ लाख रुपये पगार देण्यात आला तर कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी चालक व वाहकांचे एकूण ७२ लाख रुपये पगारापोटी देणे बाकी होते; पण के.एम.टी. प्रशासनाकडे पैसे शिल्लक नसल्याने ही थकीत पगाराची रक्कम भागविण्यासाठी महासभेने मान्य केल्याप्रमाणे विशेष अनुदान आज, सोमवारी मिळण्याची शक्यता आहे, हे अनुदान मिळाल्यानंतर जून महिन्याचा थकीत चालकांचा ४० लाख तर वाहकांचा ३२ लाख रुपये पगार देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
‘भविष्य निर्वाह निधी’बाबत ‘विशेष सभा’
के.एम.टी.तील कर्मचाऱ्यांची कपात करून घेतलेली रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे न भरल्याने के.एम.टी.ची बँक आणि इंडिया आणि आयडीबीआय या दोन बँकांतील खाती सीलबंद केली होती; पण के.एम.टी. प्रशासनाने यापैकी काही रक्कम भरल्याने ही करवाई शिथिल करण्यात येऊन खात्यातून दररोज जास्तीत-जास्त १० लाख रुपये काढण्याची मुभा मिळाली होती; पण जादा रक्कम काढण्यासाठी आणखी काही रक्कम ‘त्या’ कार्यालयाकडे भरावी लागणार आहे. याबाबत महापालिकेची ‘विशेष सभा’ घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title: ... then the 'KMT' salary will be today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.