...मगच के.पी. पाटील यांच्यावर टीका करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:27 AM2017-08-28T00:27:31+5:302017-08-28T00:27:31+5:30

... Then KP Criticize Patil | ...मगच के.पी. पाटील यांच्यावर टीका करा

...मगच के.पी. पाटील यांच्यावर टीका करा

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : बिद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अध्यक्ष कारकिर्दीत साखर कारखान्याची झालेली प्रगती बघा. अन् तत्कालीन अध्यक्षांच्या कारकिर्दीत कोटीच्या घरात तोट्यात गेलेल्या कारखान्याची त्यावेळची अवस्था बघा. मगच माजी आमदार पाटील यांच्यावर टीका करा, असा टोला माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे नाव न घेता भुदरगडचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पंडितराव केणे यांनी लगावला.
करडवाडी (ता. भुदरगड) राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सभासदांच्या येथील संपर्क मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी ज्याच्या घरात मीठ, भाकर खाल्ली त्याची जरा तरी जाण ठेवून व्यक्तिगत पातळीवर बोलावे, असा टोला आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता लगावला.
यावेळी माजी आमदार नामदेवराव भोइटे, प्रवीणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, के.डी.सी. बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, सुनील कांबळे, शेखर देसाई, मधुकर भोई, तानाजीराव कुरडे, श्रीपतराव दाभोळे, दौलतराव जाधव, नंदू पाटील, डी. जी. एकल, नेताजी पाटील, श्रीपती पाटील, जीवन पाटील, बाळासाहेब भोपळे, संग्राम देसाई, विलासराव झोरे, विलासराव कांबळे, धनाजीराव देसाई, विश्वनाय कुंभार, सर्जेराव देसाई, विजयराव आबिटकर, दत्ता पाटील, अजित सूर्यवंशी, शेखर देसाई डी. एम. चौगले, आदी उपस्थित होते. आभार प्रकाश बेलकर यांनी मानले.

Web Title: ... Then KP Criticize Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.