...तर सदाभाऊंना पुन्हा ‘स्वाभिमानी’मध्ये घेऊ सावकर मादनाईक : टीकेला उत्तर;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:51 PM2018-09-13T23:51:18+5:302018-09-13T23:51:30+5:30
सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ५७५ रुपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे. तसे झाल्यास खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत
उदगाव (जि. कोल्हापूर) : सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ५७५ रुपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे. तसे झाल्यास खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत घेऊन त्यांचा ऊस परिषदेत जाहीर सत्कार करू, असे प्रतिउत्तर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांनी मंत्री खोत यांना दिले.
भाजप सरकारने यावर्षी उसाच्या एफआरफीमध्ये मोठी वाढ केली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी बारा टक्के उताºयाला तीन हजार ५७५ रुपये इतका दर मिळणार आहे. काही साखर कारखान्यांनीही तशी तयारी दाखविली आहे. त्यामुळे आंदोलनाचे नाटक करू नका, अशी टीका कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली होती. त्या पार्श्वभूमीवर मादनाईक उदगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, आम्हाला प्रत्येक वर्षी चांगल्या ऊसदरासाठी संघर्ष करावा लागतो. गत हंगामात राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. त्यांच्याकडे जवळपास ४६५ कोटींची एफआरपी थकीत आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचे केवळ कागदी घोडे नाचविले आहेत.
खोत यांच्याकडून पोरखेळच
शेतकºयांना आश्वासनांची गाजरे दाखवीत शेतकºयांना फसवल्याची कामे आता जनतेसमोर आली आहेत. सदाभाऊ खोत यांच्यासारखा नेता जर शेतकºयांच्या पुढे एक आणि पोटात एक अशी भावना ठेवून पोरखेळच सुरू केला आहे. त्यामुळे आता तुम्ही बोलल्याप्रमाणेच तीन हजार ५७५ रुपये दर देऊन दाखवाच, असेही आव्हानही मादनाईक यांनी दिले आहे.