...तर गुरुवारी शिवसैनिक कर्नाटकचे नाके उखडून टाकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 07:43 PM2021-08-03T19:43:54+5:302021-08-03T19:45:30+5:30

Shiv Sena Collcator Office Kolahpur : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी येथे लावलेले तपासणी नाके ताबडतोब हटवण्यास कर्नाटक सरकारला सांगावे, अन्यथा उद्या, गुरुवारी शिवसैनिक ते उखडून टाकतील, असे इशारापत्र जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मंगळवारी देण्यात आले.

... then on Thursday Shiv Sainiks will uproot Karnataka | ...तर गुरुवारी शिवसैनिक कर्नाटकचे नाके उखडून टाकतील

कोल्हापुरात मंगळवारी जिल्हा शिवसेनेने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन कर्नाटक सरकारकडून महामार्गावर तपासणी नाक्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला दिल्या जात असलेल्या तक्रारीविषयी इशारापत्र देऊन नाके हटवण्याची मागणी केली.

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना शिवसेनेचे इशारा पत्र कर्नाटकची वाहनेही महाराष्ट्राने अडवावीत

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी येथे लावलेले तपासणी नाके ताबडतोब हटवण्यास कर्नाटक सरकारला सांगावे, अन्यथा उद्या, गुरुवारी शिवसैनिक ते उखडून टाकतील, असे इशारापत्र जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मंगळवारी देण्यात आले.

महाराष्ट्रातून महाराष्ट्रात जाणाऱ्यांना आरटीपीसीआरची सक्ती थांबवली नाही तर महाराष्ट्रातही कर्नाटकच्या वाहनांना प्रवेश देऊ नये, अशीही विनंती करण्यात आली.
जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कर्नाटक सरकारकडून महामार्गावर होत असलेल्या अरेरावीची वस्तुस्थिती मांडली.

महामार्गावरून कागल, आजरा, गडहिंग्लज, चंदगड या महाराष्ट्राच्या तालुक्यातील नागरिकांची रोजची ये-जा असते, पण कोविड संसर्गामुळे कर्नाटक सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कोगनोळी नाक्यावर आणि आता दूधगंगा नदीवर तपासणी नाके बसवले आहेत. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असेल तरच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना पुढे सोडले जात आहे.

महाराष्ट्रातून महाराष्ट्र जात असणाऱ्या वाहनांचीही अडवणूक केली जात आहे. तपासणी वाढवल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वादावादीचे प्रसंगही घडत आहे, पण नागरिकांवर दबाव टाकण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तेथे तैनात केला आहे.

वास्तविक महामार्ग हा केंद्र सरकारच्या मालकीचा असतानाही कर्नाटक सरकारने तो अडवणे कितपत योग्य आहे, अशी विचारणा करत महाराष्ट्रातील जनतेची अडवणूक शिवसेना कदापिही सहन करणार नाही, असेही इशारा पत्रात म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी कर्नाटक प्रशासनाशी बोलून घेण्यासाठी आजची बुधवारची मुदत दिली आहे. या मुदतीत समज देऊन नाके हटवले नाहीत तर शिवसेना गुरुवारी ते नाके उखडून फेकून देईल, असाही इशारा दिला. यावेळी मनजित माने, सुजित चव्हाण, शिवाजी जाधवही हे उपस्थित होते.
 

Web Title: ... then on Thursday Shiv Sainiks will uproot Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.