...तर वाघजाई डोंगर चढण्याची हिंमत होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:35+5:302021-09-06T04:27:35+5:30
माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी वाघजाई डोंगरावर १२ गावांतील शेतकऱ्यांचा मेळावा राजेंद्र सूर्यवंशी : वाघजाई देवालयात शेतकऱ्यांचा मेळावा लोकमत न्यूज ...
माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी
वाघजाई डोंगरावर १२ गावांतील शेतकऱ्यांचा मेळावा
राजेंद्र सूर्यवंशी : वाघजाई देवालयात शेतकऱ्यांचा मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : दीडशे वर्षे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे दगडावर खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे झाले, याची चौकशी करायला स्थानिक शेतकऱ्यांचा लढा उभारून भाग पाडणार आहे. १२ गावांतील स्थानिक शेतकऱ्यांनी एकीची वज्रमूठ बांधली, तर इतरांना वाघजाई डोंगर चढण्याची हिंमत होणार नाही, असे मत करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
वाघजाई देवीच्या देवालयात बोलावण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात सूर्यवंशी मार्गदर्शन करत होते. यावेळी मरळीचे माजी सरपंच हंबीरराव चौगले अध्यक्षस्थानी होते.
सूर्यवंशी म्हणाले, सातेरी महादेव डोंगरावरील जमिनी अशाच बेकायदेशीर विकून येथे पवनचक्की करण्याचा घाट धनदांडग्यांचा होता. पण स्थानिक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तो उधळून लावला. अशीच परिस्थिती वाघजाई डोंगराची आहे. येथे स्थानिक लोकांवर अन्याय करत दीडशे वर्षे पिढ्यान् पिढ्या शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना भूमिहीन बनवण्याचा घाट सुरू आहे.
हंबीरराव पाटील म्हणाले, आजही १२ गावांतील शेतकऱ्यांचा कब्जा या जमिनीत आहे. या जमिनीवर १२ गावांतील पशुधन अवलंबून आहे. धरणग्रस्तांनी या जमिनी नाकारल्या आहेत. पण महसूल यंत्रणेला हाताखाली घेऊन धनदांडग्या व शासकीय अधिकाऱ्यांनी या जमिनी वर्ग ब च्या अ करून शेकडो एकर कवडीमोल दराने खरेदी केली आहे.
म्हाळुंगेचे सरपंच संग्राम पाटील, भगवान पाटील, बंडा पाटील, मरळीचे सरपंच शहाजी कांबळे, शहाजी शिंदे (सातार्डे), भिकाजी पाटील, जे. एन. पाटील, (भामटे), कुंडलिक पाटील (वाकरे) यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी १२ गावांतील शेतकऱ्यांची वाघजाई बचाव समिती स्थापन केली.
‘लोकमत’चे अभिनंदन
चार दिवस वाघजाई डोंगरावरील वस्तुस्थितीचे वार्तांकन करून ‘लोकमत’ने स्थानिक शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडली, याबद्दल हंबीरराव चौगले (मरळी) यांनी ‘लोकमत’च्या अभिनंदनाचा ठराव केला व आभार मानले. याचबरोबर मरळीसह १२ गावांतील जनता ‘लोकमत’बरोबर असेल, असे सांगितले.
०५वाघजाई
वाघजाई डोंगर बचावसाठी करवीर व पन्हाळा तालुक्यातील १२ गावांतील शेतकरी एकत्र येऊन मेळावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र सूर्यवंशी, हंबीरराव चौगले जे. एन. पाटील.
050921\20210905_141249.jpg~050921\20210905_135356.jpg
फोटो
वाघजाई डोंगर बचाव साठी करवीर व पन्हाळा तालुक्यातील १२ गावातील शेतकरी एकत्र येऊन मेळावा घेतला यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र सुर्यवंशी, हंबीरराव चौगले जे एन पाटील, व शेतकरी~फोटो
वाघजाई डोंगर बचाव साठी करवीर व पन्हाळा तालुक्यातील १२ गावातील शेतकरी एकत्र येऊन मेळावा घेतला यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र सुर्यवंशी, हंबीरराव चौगले जे एन पाटील, व शेतकरी