सात नगरपालिका क्षेत्रात एकही नवा कोरोना रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:18+5:302021-09-02T04:51:18+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने खाली येत असताना गेल्या २४ तासात जिल्ह्यातील १० नगरपालिकांपैकी ७ नगरपालिकांच्या क्षेत्रात ...

There are no new corona patients in the seven municipal areas | सात नगरपालिका क्षेत्रात एकही नवा कोरोना रुग्ण नाही

सात नगरपालिका क्षेत्रात एकही नवा कोरोना रुग्ण नाही

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने खाली येत असताना गेल्या २४ तासात जिल्ह्यातील १० नगरपालिकांपैकी ७ नगरपालिकांच्या क्षेत्रात एकही नवा कोरोना रुग्ण नोंदवण्यात आलेला नाही. जिल्ह्यात ११४ नवे रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला.

कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सर्वाधिक ४१ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील दहा नगरपालिकांपैकी इचलकरंजी येथे पाच, जयसिंगपूर येथे तीन, तर गडहिंगलज येथे दोन रुग्ण आढळले आहेत. उर्वरित कुरूंदवाड, कागल, शिरोळ, हुपरी, पेठवडगाव, मलकापूर आणि मुरगुड या सात नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.

तसेच बारा तालुक्यांपैकी चंदगड आणि गगनबावडा तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. करवीर तालुक्यात १९, तर हातकणंगले तालुक्यात १३ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या १४७७ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून, १३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील एका ७३ वर्षीय पुरुषाचा आणि शाहुपुरी येथील ७२ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: There are no new corona patients in the seven municipal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.