पदवीधरसाठी साताऱ्यातून दोन अर्ज, जिल्ह्यातून एकही नामनिर्देशन पत्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 18:58 IST2020-11-09T18:56:33+5:302020-11-09T18:58:27+5:30
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सातारा जिल्ह्यातून पदवीधर मतदार संघासाठी सागर शरद भिसे आणि अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले (दोन्ही अपक्ष) अशी दोन नामनिर्देशन पत्रे शनिवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दाखल झाल्याची माहिती, पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

पदवीधरसाठी साताऱ्यातून दोन अर्ज, जिल्ह्यातून एकही नामनिर्देशन पत्र नाही
कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सातारा जिल्ह्यातून पदवीधर मतदार संघासाठी सागर शरद भिसे आणि अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले (दोन्ही अपक्ष) अशी दोन नामनिर्देशन पत्रे शनिवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दाखल झाल्याची माहिती, पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
1 डिसेंबर रोजी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी 12 नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची मुदत आहे.
आजअखेर पदवीधर मतदार संघासाठी साताऱ्यातून दाखल झालेली दोन नामनिर्देशन पत्रे वगळता आजअखेर पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघासाठी जिल्ह्यातून एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.