साखर मूल्यांकनात ९० रुपयांची वाढ

By Admin | Published: April 6, 2016 12:41 AM2016-04-06T00:41:18+5:302016-04-06T00:42:05+5:30

राज्य बँकेचा निर्णय : तीन महिन्यांत ४०० रुपयांची वाढ; साखर कारखान्यांना दिलासा

There is an increase of Rs. 90 in sugar valuation | साखर मूल्यांकनात ९० रुपयांची वाढ

साखर मूल्यांकनात ९० रुपयांची वाढ

googlenewsNext

प्रकाश पाटील -- कोपार्डे साखर दराची चढती कमान साखर उद्योगाला अर्थिक दिलासा देणारी ठरली आहे. साखर मूल्यांकनात राज्य बँकेने मंगळवारी प्रतिक्विंटल ९० रुपयांनी वाढ करून ते २९७५ रुपये केले. या मूल्यांकनाच्या ८५ टक्के म्हणजे कारखान्यांना २५२८ रुपये ७५ पैसे प्रतिक्विंटल उचल मिळणार आहे. गेल्या तीन महिन्यांत मूल्यांकनात झालेली वाढ प्रतिक्विंटल ४०० रुपयांची आहे.
साखरेचे दर घसरलेले असल्याने आॅक्टोबर २०१५ मध्ये राज्य बॅँकेने केलेले साखर मूल्यांकन २१९० रुपये प्रतिक्विंटल होते. मात्र, जानेवारी २०१६ नंतर साखरेच्या दरात वाढ सुरू झाली. जानेवारीमध्ये साखरेचा दर एक्स फॅक्टरी २७०० रुपये प्रतिक्विंटल होता. यामुळे २५७५ रुपये मूल्यांकन करण्यात आले.
फेब्रुवारीमध्ये हे दर पुन्हा ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल वाढले म्हणून मूल्यांकनात पुन्हा वाढ करून २६५५ करण्यात आले. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात यात १०५ रुपयांची वाढ करून २७६५ करण्यात आले. त्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात साखरेचे दर ३४०० रुपयांवर गेल्याने पुन्हा यात १२० रुपयांची वाढ करून २८८५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आले.
सध्या साखरेचा दर प्रतिक्विंटल ३५०० ते ३८०० रुपये एक्स फॅक्टरी आहे. यामुळे बॅँकेने साखर मूल्यांकनात मंगळवारी पुन्हा ९० रुपयांची वाढ करून ते २९७५ रुपये केले आहे. या मूल्यांकनाच्या ८५ टक्के म्हणजे २५२८ रुपये ७५ पैसे प्रतिक्विंटल उचल बँकेकडून कारखान्यांना मिळणार आहे. राज्य सहकारी बँकेच्या या धोरणामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने
शॉर्ट मार्जिनमधून बाहेर
जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा १२.५० टक्के आहे. एक टन उसापासून कारखान्यांना १२५ किलो साखर मिळत असून, साखर मूल्यांकनाने एक टनासाठी तीन हजार १६० रुपये ९३ पैसे मिळणार आहेत.
जिल्ह्यातील कारखान्यांची सरासरी एफ. आर. पी. २५०० ते २६०० असल्याने आता कारखाने शॉर्ट मार्जिनमधून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे ८०:२० पैकी उर्वरित २० टक्के एफ . आर. पी. देण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून साखर मूल्यांकनाचा लेखाजोखा
महिनासाखर मूल्यांकन वाढ
(प्रतिक्विंटल रुपये)(रुपयांत)
डिसेंबर २३८५११५
जानेवारी २०१६२५७५१९०
फेब्रुवारी२६५५८०
मार्च (पहिला आठवडा)२७६५११०
मार्च (शेवटचा आठवडा)२८८५१२०
५ एप्रिल२९७५९०

Web Title: There is an increase of Rs. 90 in sugar valuation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.