भाजपकडून दंगलीची शक्यता, डोकी शांत ठेवा; भास्कर जाधवांनी केले आवाहन

By भीमगोंड देसाई | Published: October 4, 2023 01:54 PM2023-10-04T13:54:42+5:302023-10-04T13:56:18+5:30

डोकी शांत ठेवून २०२४ साली भाजपला हद्दपार करा

There is a possibility of communal riots by BJP in the future also for political interest says Bhaskar Jadhav | भाजपकडून दंगलीची शक्यता, डोकी शांत ठेवा; भास्कर जाधवांनी केले आवाहन

भाजपकडून दंगलीची शक्यता, डोकी शांत ठेवा; भास्कर जाधवांनी केले आवाहन

googlenewsNext

कोल्हापूर : भाजप देशात, राज्यात समाजा, समाजात व्देष, दुही निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेत आहे. गेल्या आठ महिन्यात राज्यात नऊ जातीय दंगली घडल्या. यामागे भाजप असल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय स्वार्थासाठी भविष्यातही भाजपकडून जातीय दंगली घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मुस्लिम, दलित, ख्रिश्चन यासह सर्वच समाजांनी डोकी शांत ठेवून २०२४ साली भाजपला हद्दपार करावे, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी बुधवारी केले.

मुस्लिम बोर्डिंगमध्ये मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तीसोबत चर्चा करताना ते बोलत होते. बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार जाधव म्हणाले, माझ्या गुहागर मतदारसंघात दोन वर्षापूर्वी भाजपकडून जातीय दंगलींना प्रोत्साहन दिले जाईल, असे भाकीत केले होते. ते आता तंतोतंत खरे ठरत आहे. यापुढील काळातही जातीय दंगली घडवून सत्ता मिळवण्याचा डाव भाजपकडून होणार आहे. सन २०२४ मधील निवडणूकही ते दंगली घडवून आणि जनतेची फसवणूक करून जिंकण्याची तयारी करीत आहे. यामुळे डोके शांत ठेवून हा त्यांचा डाव हाणून पाडत इंडिया आघाडीला निवडून आण्यासाठी सर्वच समाज घटकांनी पाठिंबा द्यावा.

विकासाच्या बाबतील भाजप सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४, २०१९ मध्ये अनेक आश्वासन देवून सत्ता मिळवली. यातील कोणतेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. प्रत्यक्षात कोणत्याही घटकात अच्छेदिन आलेले नाहीत. यामुळे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी होऊ दे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून चौकाचौकात जावून जनतेशी संवाद साधण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: There is a possibility of communal riots by BJP in the future also for political interest says Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.