‘ध’ चा ‘मा’ करू नका, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा उपरोधिक सल्ला

By भीमगोंड देसाई | Published: December 16, 2022 12:19 PM2022-12-16T12:19:17+5:302022-12-16T12:32:12+5:30

सध्या राज्यात जे सुरू आहे, त्याला उत्तर देण्यासाठी सर्व निवडणुका जिंकल्या पाहिजे

There is no knowledge without reading, Don't Ma for Dh, minister Chandrakant Patil ironic advice | ‘ध’ चा ‘मा’ करू नका, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा उपरोधिक सल्ला

संग्रहीत फोटो

Next

कोल्हापूर : वाचल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. त्यामुळे अधिकाधिक नीट वाचन करा. कळाले नाही तर दोनवेळा वाचा, चिंतन, मनन करा. पण ‘ध’ चा ‘मा’ करू नका असा उपरोधिक सल्ला उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. महापुरूषाबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून नुकतीच त्यांच्यावर शाईफेक प्रकरणानंतर त्यांनी हे भाष्य केले आहे. कोल्हापुरात फिरते वाचनालय उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. शाईफेक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला कार्यकर्ते कमी आणि पोलिस जास्त होते.

मंत्री पाटील म्हणाले, वाचन संस्कृती वाढण्यासाठी फिरत्या वाचनालयाचा प्रयोग पुण्यात पहिल्यांदा सुरू केला. तो यशस्वी झाला. त्यानंतर येथेही हा उपक्रम राबविला जात आहे. आता सुरू केलेल्या फिरत्या वाचनालयात सहा हजार पुस्तके आहेत. शहरातील विविध ठिकाणी थांबून वाचकांना मोफत सेवा देण्यात येणार आहे. १ जानेवारीपासून शालेय मुलांसाठीही फिरते वाचनालय सुरू करण्यात येईल. शहरातील सर्व रूग्णांसाठी फिरते रूग्णालयही सुरू केले जाईल.

निवडणुका जिंका

सध्या राज्यात जे सुरू आहे, त्याला उत्तर देण्यासाठी सर्व निवडणुका जिंकल्या पाहिजे. आम्ही लोकांसाठी विविध उपक्रम राबवतो. काम करतो. म्हणून आम्हाला गुजरातमध्ये १५६ जागा मिळाल्या. विरोधक विचारतात इतक्या जागा कशा ?

कार्यकर्त्यावर चिडले

दिवसभरात अनेक कार्यक्रम असल्याने मंत्री पाटील हे कार्यक्रमात घाई करीत होते. भाषण संपल्यानंतर ते जात असतानाच काहीजण हार, तुरे घेवून येवू लागले. आता हे नको, मला खूप कार्यक्रम आहेत, असे ते म्हणाले. तरीही एक अतीउत्साही कार्यकर्ता सत्कारासाठी गळ घालू लागला. त्याच्यावर चिडून मी सांगतोय ना, असे सुनावले. यावर तो कार्यकर्ता शांत झाला.

Web Title: There is no knowledge without reading, Don't Ma for Dh, minister Chandrakant Patil ironic advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.