व्यावसायिकांसाठी अजून खूप काम करायचे आहे : भरत ओसवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 05:20 PM2019-06-10T17:20:20+5:302019-06-10T17:21:39+5:30
माझ्या सराफ व्यावसायिकांसाठी अजून मला खूप काम करावयाचे आहे; ेत्यासाठी मी झटण्यास सदैव तयार असल्याचे प्रतिपादन मावळते अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले.
कोल्हापूर : माझ्या सराफ व्यावसायिकांसाठी अजून मला खूप काम करावयाचे आहे; ेत्यासाठी मी झटण्यास सदैव तयार असल्याचे प्रतिपादन मावळते अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या द्विवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानिमित्त संस्थेत विद्यमान पदाधिकारी आणि संचालक मंडळाचा निरोप सभारंभ झाला, त्यावेळी ओसवाल यांचा गणेशप्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पदाधिकारी, संचालकांचा करवीरनिवासिनी अंबाबाईची प्रतिमा देऊन गौरव केला.
ओसवाल म्हणाले, २२ जानेवारी २०१७ रोजी संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले आणि संस्थेच्या माध्यमातून माझा सभासद कसा सक्षम कसा होईल, त्याला नवतंत्रज्ञानाची ओळख व्हावी, हाच ध्यास घेतला. ग्राहक मेळावा, लाभम्, आभूषणम् अशा कार्यक्रमांचे आयोजन केले. जीएसटी, बदलते कायदे यांची जाणीव सभासदाला कार्यशाळेच्या माध्यमातून करून दिली. सभासदांसाठी मला सर्वांच्या सहकार्याने अजून खूप काम करावयाचे आहे.
यावेळी उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव माणिक जैन, विजय हावळ, संचालक जितेंद्र राठोड, अनिल पोतदार, शिवाजी पाटील, रवींद्र राठोड यांनीही मनोगतातून ओसवाल यांना शुभेच्छा दिल्या. संचालक धर्मपाल जिरगे, किरण गांधी, संजय चोडणकर, नितीन ओसवाल, महेंद्र ओसवाल, बाबासाहेब खाडे, उमेश शेळके, विक्रम कुलकर्णी, शुभम माने, सुरेश चौगले, आदी उपस्थित होते.
जीजेसी अध्यक्षपद, गोल्ड क्लस्टर
संचालक रवींद्र राठोड यांनी, भरत ओसवाल यांची आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या (जीजेसी) अध्यक्षपदी निवड होऊन येथील व्यावसायिकांच्या कक्षा रुंदविण्यास त्याचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अनिल पोतदार यांनी, ओसवाल यांच्या हस्ते गोल्ड क्लस्टरचा प्रस्ताव पूर्णत्वास जाऊन यशोशिखरावर असलेला येथील व्यावसायिक पुन्हा यशाचे शिखर गाठू दे, अशी अपेक्षा व्यक्त केली.