महापुरावर कायमस्वरुपी उपाय शोधणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:27 AM2021-08-19T04:27:25+5:302021-08-19T04:27:25+5:30
खोची : नदीकाठच्या गावांत लोकांनी लाखो रुपये खर्चून घरे बांधली आहेत. ती घरे सोडण्याची पूर्ण मानसिकता ग्रामस्थांमध्ये दिसत नाही. ...
खोची : नदीकाठच्या गावांत लोकांनी लाखो रुपये खर्चून घरे बांधली आहेत. ती घरे सोडण्याची पूर्ण मानसिकता ग्रामस्थांमध्ये दिसत नाही. निसर्गाच्या विरुद्ध कृती होत असल्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची वेळ येऊ लागली आहे.पुनर्वसन हा काय महापुरावर उपाय नाही; मात्र महापुराची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केले.
भेंडवडे, खोची येथील पूरग्रस्तांना जिल्हा परिषद सदस्य डॉ.अशोक माने यांच्या वतीने दिलेल्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप आमदार कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अशोक माने म्हणाले,पूरग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आघाडीवर प्रयत्न केले जातील. शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून पुनर्वसनासाठी सहकार्य केले जाईल. भेंडवडे येथील कार्यक्रमात सरपंच काकासोा चव्हाण, उपसरपंच डॉ.संजय देसाई, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, माजी सभापती डॉ.प्रदीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील,प्रदीप देशमुख,महेंद्र शिंदे,सुनील पसाले, सुहास देसाई,सुनील देसाई,विनोद देसाई तर खोची येथे सरपंच जगदीश पाटील,दीपक पाटील,वसंतराव गुरव,अमरसिंह पाटील,महेश पाटील,सयाजी पाटील उपस्थित होते.
फोटो : १८ भेंडवडे कोरे
भेंडवडे येथे पूरग्रस्तांना साहित्य वाटपप्रसंगी आमदार विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण पाटील,डॉ.प्रदीप पाटील,अशोक माने,काकासोा चव्हाण,सुनील पसाले,उत्तम पाटील उपस्थित होते.(छाया-आयुब मुल्ला)