‘आजरा’साठी गाफीलपणा नको

By admin | Published: April 18, 2016 12:15 AM2016-04-18T00:15:50+5:302016-04-18T01:08:12+5:30

नंदिनी बाभूळकर : किणे येथे मेळावा; ‘राष्ट्रवादी’चे कुटुंब पुढे नेण्याची जबाबदारी केसरकरांवर

There is no confusion over 'Azra' | ‘आजरा’साठी गाफीलपणा नको

‘आजरा’साठी गाफीलपणा नको

Next

आजरा : राष्ट्रवादी काँगे्रस हे एक कुटुंब आहे आणि कुटुंब म्हटले की भांड्याला भांड लागणार त्यामुळे विष्णुपंत केसरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांवर हे कुटुंब पुढे नेण्याची जबाबदारी आहे. गडहिंग्लज साखर कारखान्यात गाफीलपणा नडल्याने काही जागा गमवाव्या लागल्या; पण आजरा कारखान्यात असा गाफीलपणा राहणार नाही याची काळजी घ्या, असे प्रतिपादन डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी केले.
गडहिंग्लज साखर कारखाना संचालक मंडळ व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि विष्णुपंत केसरकर यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गडहिंग्लज राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी डॉ. बाभूळकर बोलत होत्या.
प्रास्ताविकपर भाषणात सभापती विष्णुपंत केसरकर म्हणाले, साखर कारखान्यात आपण गेली २० वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. कारखान्याचा कामगार असो, अथवा शेतकरी असो कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता आपण घेतली.
२४ तास उपलब्ध असणारा पूर्णवेळ कार्यकर्ता असून, काही मंडळी मात्र नाहक आपणाला विरोध करीत आहेत. त्यामुळे नेत्यांनीच हलके कान न ठेवता माणसे तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
गडहिंग्लज कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे म्हणाले, केसरकरांची राजकीय वाटचाल आपण जवळून पाहिली आहे. कामाशी जोडलेला व सामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारा हा माणूस आहे. पक्ष बाजूला ठेवून आजरा कारखाना निवडणुकीत आपण केसरकर यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी नवीद मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादीतून बाजूला गेलेल्या नेतेमंडळींना एकत्र करून कारखाना निवडणुकीची मोट आमदार मुश्रीफ बांधत आहेत. आजरा साखर कारखान्यात विष्णुपंतांसारखी मंडळी पॅनेलमध्ये असल्यास पॅनेलचा विजय मोठ्या फरकाने होईल.
यावेळी ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर बी. एन. पाटील यांची भाषणे झाले. मेळाव्यास मारुती घोरपडे, बी. टी. जाधव, डॉ. गोपाळ केसरकर, विद्याधर गुरबे, राजश्री पाटील, सतीश पाटील, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: There is no confusion over 'Azra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.