पेयजलमधील भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही

By admin | Published: January 1, 2017 11:26 PM2017-01-01T23:26:11+5:302017-01-01T23:26:11+5:30

सदाभाऊ खोत : चिपरी येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन

There is no corruption in drinking water | पेयजलमधील भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही

पेयजलमधील भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही

Next

जयसिंगपूर : अपुऱ्या व मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पेयजल योजना पूर्णत्वासकडे नेणार आहे. अनेक गावांत या योजनेत घोटाळे झाले आहेत. सध्या पाणीपुरवठा व स्वच्छता खाते माझ्याकडे असल्याने ज्यांनी हे घोटाळे केले आहेत, त्यांची गय करणार नाही, असा इशारा राज्याचे कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार असल्यामुळे हे सरकार शेतकऱ्याचे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चिपरी (ता. शिरोळ) येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालय व बौद्ध समाज मंदिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री खोत बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांत शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे, तर तालुक्यातील प्रत्येक गावाला एक कोटी रुपयाचा निधी देणार आहे. त्यामुळे तालुका विकासाच्या अव्वलस्थानी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागत धनपाल कनवाडे, तर प्रस्ताविक सरपंच सुरेश भाटिया यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीता परीट, सावकार मादनाईक, जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ. नीता माने, पक्षप्रतोत बजरंग खामकर, भगवान काटे, प्रा. जालिंदर पाटील, मनोज राजगिरे, भगवानराव कांबळे, ग्रामसेवक बी. एन. टोणे, शीतल पाटील, अर्चना मरळे, वनिता जगदाळे, मिलिंद जगदाळे, प्रवीण देसाई, जयपाल कोळी, श्रीकांत पवार, रमेश रजपूत, विविध संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच अभयकुमार पाटील यांनी आभार मानले.

चिपरीचा रस्ता करणार
चिपरी उद्घाटनप्रसंगी खासदार राजू शेट्टी म्हणाले, खासगी ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या अंतर्गत जोड रस्त्यावरील चिपरी गावाचा रस्ता अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या गावाच्या चारही बाजूला रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने चिपरी गावाच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री फंडातून सदाभाऊ खोत निधी देणार आहेत. तसेच खासदार फंडातून निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.

Web Title: There is no corruption in drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.