मराठा आरक्षण टिकेल याची शाश्वती नाही: धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:56 AM2019-01-30T00:56:46+5:302019-01-30T00:56:50+5:30

रहिमतपूर (जि. सातारा) : ‘भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारने धनगर आरक्षण दिले नाही. मराठा आरक्षण दिले ...

There is no guarantee that the Maratha reservation can be maintained: Dhananjay Munde | मराठा आरक्षण टिकेल याची शाश्वती नाही: धनंजय मुंडे

मराठा आरक्षण टिकेल याची शाश्वती नाही: धनंजय मुंडे

Next

रहिमतपूर (जि. सातारा) : ‘भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारने धनगर आरक्षण दिले नाही. मराठा आरक्षण दिले असले तरी ते टिकेल याची शाश्वती नाही. गत निवडणुकीतील आपली भाषणं मोदींनीच पुन्हा पाहिली तर या निवडणुकीला ते प्रचाराला येणार नाहीत एवढी फसवी आश्वासने जनतेला दिली आहेत,’ अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या स्वागतानंतर गांधी चौकात झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, यांच्यासह आमदार उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, ‘२०१४ च्या निवडणुकीत महागाई झाल्याची बोंब करून केंद्र्रात व राज्यात भाजपने सत्ता मिळवली. आता पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर बघितले तर महागाईने कळस गाठला आहे. आता यांना ही महागाई दिसत नाही का? दरवर्षी दोनशे कोटी नोकºया देण्याची घोषणा करणाºयांनी साडेचार वर्षांत
किती नोकºया दिल्या, याचा हिशोब द्यावा.’
‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा करणाºया भाजप सरकारने देश आणि महाराष्ट्र कर्जात बुडवला आहे. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देण्याची घोषणा करणाºया नरेंद्र मोदी यांनी साडेचार वर्षांत ८३ लाख कोटी कर्ज केले तर देवेंद्र्र फडणीस यांनी महाराष्ट्राची तिजोरी रिकामी केली, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

Web Title: There is no guarantee that the Maratha reservation can be maintained: Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.