जिल्ह्यात २८४ शाळांत इंटरनेटच नाही; मग ऑनलाईन एज्युकेशन सुरू कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:54+5:302021-07-14T04:26:54+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यावर्षी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २,२७५ शाळांपैकी २८४ शाळांमध्ये इंटरनेटच नाही. ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यावर्षी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २,२७५ शाळांपैकी २८४ शाळांमध्ये इंटरनेटच नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन सुरू कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या एकूण १९७७, तर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या २९८ शाळा आहेत. त्यात शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. त्यातील जिल्हा परिषदेच्या १७१, तर महापालिकेच्या ११३ शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाहीत. उर्वरित शाळांमध्ये इंटरनेट, टॅब्लेट, ई-लर्निंग, एलसीडी प्रोजेक्टर आणि संगणक सुविधा आहे. इंटरनेट नसलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत ऑनलाईन पध्दतीनेच शिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये इंटरनेटची उपलब्धता असणे गरजेचे आहे.
पॉईंटर
जिल्ह्यातील एकूण शाळा : २२७५
महापालिकेच्या एकूण शाळा : २९८
शासकीय शाळा : ६५
अनुदानित शाळा : १४७
विनाअनुदानित शाळा : ८६
शिक्षकांना मोबाईलचा आधार
कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. मात्र, त्यासाठीच्या साधनांची पुरेशी उपलब्धता नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. इंटरनेट नसलेल्या शाळांमध्ये शिक्षक हे स्वत:च्या मोबाईल, स्मार्टफोनव्दारे शिक्षण देत आहेत.
- मालुताई जाधव
कोरोनामुळे ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. मात्र, या स्वरूपातील शिक्षणाला काही मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आमच्या शाळेने कोरोनाचे नियम आणि शासन अटींचे पालन करून प्रत्यक्षात वर्ग सुरू केले आहेत.
- चंद्रकांत भोई
ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय असते रे भाऊ
आमच्या गावात योग्य स्वरूपात इंटरनेट मिळत नाही. ऑनलाईन शिक्षण घेण्यात वारंवार अडथळा निर्माण होताे. त्यामुळे अशा पध्दतीने शिक्षण घेणे अडचणीचे ठरत आहे.
- प्रसाद हेंबाडे
ऑनलाईन शिक्षणामुळे मी शिक्षण घेत आहे, असे वाटले नाही. वर्गात शिकवलेले पटकन समजते. त्यामुळे आता वर्ग सुरू झाल्याने खूप चांगले झाले आहे.
-सिध्दिका सुतार.
शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात इंटरनेट उपलब्ध असलेल्या प्राथमिक शाळांची संख्या चांगली आहे. ज्या शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाही, तेथील शिक्षक हे स्व:खर्चातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत.
- एस. के. यादव, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती.
120721\12kol_1_12072021_5.jpg
डमी (१२०७२०२१-कोल-स्टार ८९२ डमी)