सार्वजनिक नमाज पठण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:36+5:302021-05-13T04:23:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मुस्लीम बांधवांनी काेरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या रुग्णांचा विचार करता रमजान ...

There is no public prayer | सार्वजनिक नमाज पठण नाही

सार्वजनिक नमाज पठण नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मुस्लीम बांधवांनी काेरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या रुग्णांचा विचार करता रमजान ईद साधेपणाने साजरी करावी. नमाज पठणासाठी मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.

मुस्लीम बांधवांची रमजान ईद गुरुवार किंवा शुक्रवारी (चंद्रदर्शनावर अवलंबून) साजरी होत आहे. यानिमित्त सामान खरेदीसाठी दिलेल्या वेळेव्यतिरिक्त अन्य वेळेत नागरिकांनी गर्दी करु नये. यासह मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केेले आहे.

-

Web Title: There is no public prayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.