छायाचित्र नसलेला एकही मतदार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:40+5:302021-07-02T04:16:40+5:30

कोल्हापूर : विधानसभानिहाय मतदारयादी अपडेट ठेवण्यात कोल्हापूर राज्यात अव्वल आहे. जिल्ह्यातील मतदार यादीत नावाचा समावेश असलेला मात्र त्यावर छायाचित्र ...

There is no voter without a photograph | छायाचित्र नसलेला एकही मतदार नाही

छायाचित्र नसलेला एकही मतदार नाही

Next

कोल्हापूर : विधानसभानिहाय मतदारयादी अपडेट ठेवण्यात कोल्हापूर राज्यात अव्वल आहे. जिल्ह्यातील मतदार यादीत नावाचा समावेश असलेला मात्र त्यावर छायाचित्र नसलेला एकदेखील मतदान नाही. राज्यात कोल्हापूर आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यामुळे याबाबतीत जिल्ह्याची यादी निरंक आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीत मतदारांच्या नावापुढे छायाचित्र असणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांत मतदारांनी आपले छायाचित्र निवडणूक विभागाकडे जमा न केलेले नाही, अशा मतदारांची नावे पाच जुलैनंतर मतदार यादीतून वगळ्यात येणार आहे. कोल्हापुरात मात्र अशी स्थिती नाही. येथील निवडणूक विभागाने २०१५ सालापासूनच मतदारयादी अपडेट करण्याची मोहीम सुरू केली. शिवाय त्यात सातत्यही ठेवले. त्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक अधिकारी यांच्यामार्फत चावडी, तहसील कार्यालये, महापालिका क्षेत्र अशा सगळ्या ठिकाणी या याद्या लावण्यात आल्या. मतदारांकडून छायाचित्रे घेण्यात आली.

जिल्ह्यात एकही मतदार असा नाही ज्याच्या नावापुढे छायाचित्र नाही. त्यामुळे कोल्हापुरातील ही यादी निरंक आहे.

---

विधानसभानिहाय मतदारयादी

विभाग : पुरुष : स्त्री : इतर : एकूण

चंदगड : १ लाख ५९ हजार ७०८ : १ लाख ५९ हजार २०३ : ० : ३ लाख १८ हजार ९११

राधानगरी : १ लाख ७० हजार ८०० : १ लाख ५८ हजार ०६१ : ० : ३ लाख २८ हजार ८६१

कागल : १ लाख ६३ हजार ७८६ : १ लाख ६० हजार ८९० : १ : ३ लाख २४ हजार ६७७

कोल्हापूर दक्षिण : १ लाख ७१ हजार १०३ : १ लाख ६१ हजार ५३९ : ८ : ३ लाख ३२ हजार ६५०

करवीर : १ लाख ६० हजार ५३३ : १ लाख ४६ हजार ६५२ : १ : ३ लाख ७ हजार १८६

कोल्हापूर उत्तर : १ लाख ४५ हजार ६९७ : १ लाख ४५ हजार ३०६ : ५ : २ लाख ९१ हजार ००८

शाहूवाडी : १ लाख ५१ हजार ३३८ : १ लाख ४० हजार ६६६ : ३ : २ लाख ९२ हजार ००७

हातकणंगले : १ लाख ६६ हजार १९७ : १ लाख ५४ हजार ९६८ : ५ : ३ लाख २१ हजार १७०

इचलकरंजी : १ लाख ५४ हजार ३३१ : १ लाख ४२ हजार ५७२ : ५५ : २ लाख ९६ हजार ९५८

शिरोळ : १ लाख ५७ हजार ०४५ : १ लाख ५१ हजार ४३३ : ३ लाख ८ हजार ४७८

एकूण : १६ लाख ००५३८ : १५ लाख २१ हजार २९० : ७८ : ३१ लाख २१ हजार ९०६

----

दुबार नावे २२

सध्या जिल्ह्यात २२ मतदारांची नावे दुबार आहेत, जी अन्य जिल्ह्यांमधील आहेत. त्यांच्या नावांची पडताळणी व नावे वगळ्याची कार्यवाहीदेखील सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार छायाचित्र, इपीक नंबर, दुबार अशा विविध निकषांनुसार सर्वसाधारण रँंकिंगमध्ये जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुबार नावे वगळ्याची प्रक्रिया झाली की जिल्हा प्रथम क्रमांकावर येऊ शकेल, अशी माहिती निवडणूक तहसीलदार अर्चना शेटे यांनी दिली.

--

निवडणूक विभागाने गेल्या दोन वर्षांत पुढाकार घेऊन मतदार याद्या अपडेट ठेवण्याची मोहीम राबवली. छायाचित्र नसलेल्यांची यादी प्रसिद्ध करून ती १५ दिवसांत न दिल्यास नावे वगळण्याचा इशारा देण्यात आला. शिवाय बीएलओमार्फत त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्ह्यातील एकही मतदाराचे नाव छायाचित्राविना नाही.

भगवान कांबळे, निवडणूक अधिकारी

Web Title: There is no voter without a photograph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.