पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत स्पष्ट आदेश व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:21 AM2021-01-15T04:21:05+5:302021-01-15T04:21:05+5:30

शासनाच्या निर्देशानुसार सर्वच शाळांनी २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. जिल्ह्यांतील बहुतांशी शाळांनी स्थानिक परिस्थितीनुसार, ...

There should be clear orders for starting classes V to VIII | पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत स्पष्ट आदेश व्हावेत

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत स्पष्ट आदेश व्हावेत

Next

शासनाच्या निर्देशानुसार सर्वच शाळांनी २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. जिल्ह्यांतील बहुतांशी शाळांनी स्थानिक परिस्थितीनुसार, पाचवी ते आठवीचे वर्ग केले आहेत; मात्र यामध्ये एकवाक्यता नाही. हे वर्ग सुरू करण्याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने विद्यार्थ्यांना एस. टी. पासही दिले जात नाहीत. त्यामुळे पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शाळांना स्पष्ट आदेश व्हावेत, त्याबाबत मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने या निवेदनाद्वारे केली. याबाबतचा निर्णय लवकरच सर्वांना कळविला जाईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी लोहार यांनी दिले. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव लक्ष्मीकांत सावंत, उपशिक्षणाधिकारी डी. एस.पोवार, राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, कायम विना अनुदान शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, सचिव दत्ता पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे सदस्य शिवाजी यल्लाप्पा कोरवी, एम. आर. पाटील, सहसचिव अजित रणदिवे, लोकल ऑडिटर इरफान अन्सारी उपस्थित होते.

Web Title: There should be clear orders for starting classes V to VIII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.