ग्रंथालयाच्या दारात रांगा लागाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:40+5:302021-07-26T04:23:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोगावती : मंदिराच्या दारात ज्याप्रमाणे रांगा लागतात, तशा रांगा वाचनालयाच्या दारातही दिसायला हव्यात, अशी अपेक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भोगावती : मंदिराच्या दारात ज्याप्रमाणे रांगा लागतात, तशा रांगा वाचनालयाच्या दारातही दिसायला हव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केली. मोहडे (ता. राधानगरी) येथील विठूमाऊली संकुलाच्या अभ्यासिकेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक किसन चौगले, मुंबईचे पोलीस निरीक्षक अमर पाटील उपस्थित होते. मोहडेचे सुपुत्र अमर पाटील यांनी स्वखर्चाने गावातील शालेय विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी ही अभ्यासिका आणि ग्रंथालय मोफत सुरु केले आहे.
यावेळी संजीवनी कदम, आबाजी पाटील, यशवंत पाटील, प्रकाश पाटील, एस. डी. पाटील, मेघा पाटील, उद्योजक उदय शेळके उपस्थित होते.
फोटो ओळी :
मोहडे (ता. राधानगरी) येथे विठूमाऊली अभ्यासिकेचे उद्घाटन ए. वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. किसन चौगले, अमर पाटील, आबाजी पाटील उपस्थित होते.