पोलीस ठाण्याच्या इमारतीत शाहू-आंबेडकर स्मारक व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:26+5:302021-09-02T04:53:26+5:30

कोल्हापूर : शाहुपुरीतील जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीत राजर्षी शाहू-आंबेडकर यांची भेट झाली होती. येथे त्यांचे भव्य स्मारक उभारावे, अशी ...

There should be a Shahu-Ambedkar memorial in the police station building | पोलीस ठाण्याच्या इमारतीत शाहू-आंबेडकर स्मारक व्हावे

पोलीस ठाण्याच्या इमारतीत शाहू-आंबेडकर स्मारक व्हावे

googlenewsNext

कोल्हापूर : शाहुपुरीतील जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीत राजर्षी शाहू-आंबेडकर यांची भेट झाली होती. येथे त्यांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाने बुधवारी जिल्हा प्रशासनाकडे केली. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

राजर्षी शाहू महाराज यांनी अस्पृश्य परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बोलावले होते, त्यावेळी त्यांची व शाहू महाराजांची भेट रेल्वे स्टेशनसमोरील गेस्ट हाऊसमध्ये झाली होती. त्यानंतरही अनेकवेळा डॉ. आंबेडकर येथे वास्तव्यास होते. पुढे त्याचे पोलीस ठाण्यात रूपांतर झाले. पण दोन महामानवांचा सहवास लाभलेली ही वास्तू ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्याऐवजी वाहतुकीस अडथळा होतो म्हणून जमीनदोस्त करण्यात आली. आता येथे मोठी इमारत उभारण्याचा घाट घातला जात आहे. या वास्तूचे महत्व ओळखून येथे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, विद्याधर कांबळे, आर. बी. कोसंबी, सुरेश सावर्डेकर, विलास भास्कर, रतन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

---

फोटो नं ०१०९२०२१-कोल-आरपीआय निवेदन

ओळ : कोल्हापुरातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्यावतीने बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना शाहुपुरी येथे शाहू-आंबेडकर स्मारक व्हावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.

---

Web Title: There should be a Shahu-Ambedkar memorial in the police station building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.