बँकिंग, वित्तीय बाजार, विमा क्षेत्रांसाठी एकच नियंत्रक असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:45 AM2021-02-18T04:45:13+5:302021-02-18T04:45:13+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या आर. एन. गोडबोले अध्यासनामार्फत ‘भारतातील वित्तीय तंत्रज्ञानाची स्वीकृती : व्याप्ती व आव्हाने’ या विषयावर त्यांचे व्याख्यान ...
शिवाजी विद्यापीठाच्या आर. एन. गोडबोले अध्यासनामार्फत ‘भारतातील वित्तीय तंत्रज्ञानाची स्वीकृती : व्याप्ती व आव्हाने’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. वित्तीय तंत्रज्ञान (फिनटेक) पुरवणाऱ्या कंपन्यांच्या संख्या वाढत आहे. निश्चलनीकरण व गेल्या वर्षभरातील कोरोना संसर्ग यामुळे संगणकीकृत आणि ऑनलाइन व्यवहारात वाढ होत आहे. तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण ग्राहकांना वित्तीय सेवा देण्यास उपयुक्त ठरले आहे. मात्र, नियंत्रण, वैश्विक वित्तीय संस्था, नियमाधारित की तत्त्वाधारित नियंत्रण, एकल की बहुनियंत्रण आदी आव्हाने फिनटेक कंपन्यांसमोर असल्याचे प्रा. निसार यांनी सांगितले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, डॉ. ए. एम. गुरव उपस्थित होते. अध्यासनप्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले. केदार मारुलकर यांनी आभार मानले. संशोधन सहायक तेजपाल मोहरेकर, प्रियंका कुंभार यांनी व्याख्यानाचे संयोजन केले.
चौकट
अभ्यासक्रमात समावेश करावा
फिनटेकसंदर्भातील नव्या पिढीची गरज ओळखून आवश्यक ते बदल घडविले पाहिजेत. उच्चशिक्षण संस्थांनी फिनटेकबाबतचा वाढता कल विचारात घेऊन त्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.
फोटो (१७०२२०२१-कोल-शरिक निसार (शिवाजी विद्यापीठ)