बालिंग्यातील सराफाचा ठावठिकाणा लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:35+5:302021-04-30T04:28:35+5:30

कोपार्डे : करवीर तालुक्यातील अनेक गावांतील पिग्मी, भिशी व सुवर्ण ठेवमध्ये गुंतवणूक करणाऱ्या शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून ...

There was no place for the bullion in Balinga | बालिंग्यातील सराफाचा ठावठिकाणा लागेना

बालिंग्यातील सराफाचा ठावठिकाणा लागेना

Next

कोपार्डे : करवीर तालुक्यातील अनेक गावांतील पिग्मी, भिशी व सुवर्ण ठेवमध्ये गुंतवणूक करणाऱ्या शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या बालिंगा येथील सराफाचा पोलिसांना अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. अडीच कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊनही अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले नसल्याने गुंंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

मूळचा दोनवडे येथील असणारा सराफ सतीश पोवाळकरने बालिंगा येथे आंबिका ज्वेलर्स सोने चांदीचे ज्वेलरी दुकान थाटले होते. यातून त्याने पिग्मी, भिशी व्यवसायही थाटला होता. ज्वेलरीच्याआडून लोकांच्यात विश्वास निर्माण करून बेकायदेशीर सुवर्ण ठेव योजना सुरू केली. बेकायदेशीर गुंंतवणूक करीत असल्याचे माहिती असूनही महिलांंनी सोन्याच्या, गुंतवणूकदारांनी व्याजाच्या व बचतीच्या हव्यासापोटी चोराच्या हातात पैशाची थैली देत असल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही.

ज्वेलरीचे दुकान व घरातील किमती वस्तू घेऊन सराफ सतीश पोवाळकर आपल्या पत्नीसह फरार झाला. आठ दिवसांनी गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. लाखोंची गुंतवणूक घेऊन फरार झालेल्या सतीश पोवाळकर विरोधात प्रथम पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास कुचराई करीत होते. गुंतवणूकदारांनी एकत्र येत आवाज उठविल्यानंतर दोन दिवसांनी २ कोटी ९ लाख रुपये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण एवढ्या मोठ्या फसवणुकीचा गुन्हा करूनही एकाही आरोपीला अटक झालेली नसल्याने गुंंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

चौकट : गुंतवणूकदार हतबल

कष्टाने मिळविलेले पैसे भविष्यात उपयोगी पडावेत म्हणून गुंतवणूकदारांनी सराफाकडे विश्वासाने दिले. पण तो फसवणूक करून फरार झाला. आता अशा फसवणूक करणाऱ्या सराफा विरोधात कायदा हातात घेऊन काही करता येत नाही आणि पोलीस तपासात फरार सराफ सापडल्या शिवाय काही बाहेर येणार नाही. यामुळे हतबल झालेल्या गुंतवणूकदारांचे पोलीस कारवाईकडे लक्ष आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी सराफ पोवाळकर यांच्या कणेरकरनगरमधील घराचा व बालिंगा येथील आंबिका ज्वेलर्स या दुकानाचा इनकॅमेरा पंचनामा केला आहे. पण यातून पोलिसांना काही हाती लागलेले नाही. यामुळेच या फसवणूक प्रकरणी कोणतेही वक्तव्य न करणा फक्त तपास चालू असल्याचे करवीर पोलीस ठाण्यातून सांगण्यात येत आहे.

Web Title: There was no place for the bullion in Balinga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.