स्मशानभूमीच्या जागेसाठी बोंब मारो आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:28 AM2021-08-28T04:28:26+5:302021-08-28T04:28:26+5:30
बहिरेवाडीतील मातंग व बौद्ध समाज पूर्वापार महादेव दादू कांबळे यांच्या मालकीच्या गट नंबर २४ मधील २ गुंठे जागेत गेली ...
बहिरेवाडीतील मातंग व बौद्ध समाज पूर्वापार महादेव दादू कांबळे यांच्या मालकीच्या गट नंबर २४ मधील २ गुंठे जागेत गेली ७० ते ८० वर्षांपासून मृतदेह दफन करीत होता. मात्र अलीकडे त्यांनी याला विरोध केला आहे. याबाबत समाजाने आजरा तहसीलदार यांच्याकडे दाद मागितली. मात्र, सात-बारा पत्रकी पीक पाहणीस कोणाच्या आदेशाने नोंद केली, या तांत्रिक मुद्द्यावर तहसीलदाराने समाजाच्या विरोधात निकाल दिला. या विरुद्धही समाजाने प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. दरम्यानच्या काळात संबंधित जमीन मालक व समाजामध्ये ग्रामपंचायतीमार्फत अनेक तडजोडी केल्या; पण त्यातून समाजाला लाभ झाला नाही. समाजासाठी ग्रामपंचायत गावठाणमधील गट नंबर ३२४-१-ड या क्षेत्रात १० गुंठे जागा समाजाला मिळालेली आहे. संबंधित जागा समाजाच्या ताब्यात द्यावी अन्यथा २ सप्टेंबरला बोंब मारो आंदोलन कोरोना महामारीचे शासनाचे नियम पाळून करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर बाबूराव आयवाळे, रामचंद्र आयवाळे, शिवाजी दावणे, देवाप्पा कांबळे यासह समाज बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत. निवेदनाची प्रत आजऱ्याचे नायब तहसीलदार डी.डी. कोळी यांना देण्यात आले आहे.
फोटो ओळी : स्मशानभूमीच्या जागेचा ताबा मिळावा यासाठी नायब तहसीलदार डी. डी. कोळी यांच्याकडे निवेदन देताना बाबूराव आयवाळे, रामचंद्र आयवाळे आदी.
क्रमांक : २७०८२०२१-गड-०७