महापालिकेचे आर्थिक लेखापरीक्षण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:36+5:302021-03-04T04:43:36+5:30
महापालिकेच्या सन २०१५-२०१६, सन २०१६-२०१७ आणि सन २०१७- २०१८ अशा तीन वर्षाचे लेख्यांचे लेखापरीक्षण व वार्षिक लेखे प्रमाणीकरणाची हे ...
महापालिकेच्या सन २०१५-२०१६, सन २०१६-२०१७ आणि सन २०१७- २०१८ अशा तीन वर्षाचे लेख्यांचे लेखापरीक्षण व वार्षिक लेखे प्रमाणीकरणाची हे काम दि. १० मार्चपासून हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या लेखापरीक्षण पथकाची त्याकरीता नेमणूक करण्या येणार आहे. लेखा परीक्षणाचे काम योग्यप्रकारे व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लेखापरीक्षण पथकास आवश्यक सुविधा तसेच लेख्यांच्या संदर्भातील सर्व प्रमाणके, विवरणपत्रे, विवरण पत्रव्यवहार, टिप्पण्या किंवा दस्ताऐवज सादर करण्याची सूचना महापालिकेला देण्यात आली आहे.
लेखापरीक्षणात निदर्शनास आलेल्या आक्षेपांचे निराकरण त्वरित करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, लेखापरीक्षणासाठी लेखे सादर करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणाची आहे. दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यास पथकासमोर हजर राहण्यास फर्मावण्याचा अधिकार लेखापरीक्षकास आहे तसेच मागणी करूनही लेखापरीक्षणास अभिलेख सादर न केल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार व तरतूद आहे, असेही टळे यांनी दिलेल्या नोटिसीत नमूद केले आहे.