‘गोकुळ’च्या कारभारात सूडभावना नसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:30+5:302021-05-08T04:24:30+5:30
कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे कल्याण आमच्या हातून होईल, या भावनेने ठरावधारकांनी सत्ता आमच्या हाती दिली आहे. ...
कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे कल्याण आमच्या हातून होईल, या भावनेने ठरावधारकांनी सत्ता आमच्या हाती दिली आहे. ठरावधारक आणि देवाच्या कृपेने हा ऐतिहासिक विजय आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे दूध संघाच्या कारभारात गर्व, सूडभावना असणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कागलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, मी मतदान झाल्यानंतर बोललो होतो. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चित असून, फक्त अध्यक्ष निवडीची औपचारिकताच बाकी आहे. निकालही तसाच लागला. गोकुळ मल्टिस्टेट करण्यास विरोध, तसेच पारदर्शक कारभार या मुद्द्यावर मी व पालकमंत्री यांनी संघर्ष सुरू केला. अनेक वर्षे लढा दिला आणि सकारात्मक अजेंडा घेऊन या निवडणुकीत उतरलो. ज्येष्ठ संचालकांचे आमच्या बाजूने येणे, न्यायालयानेही निवडणुकीस स्थगिती देण्यास नकार देणे अशी नियतीही आमच्याच बाजूने राहिली. लिटरला दोन रुपये दरवाढ, पारदर्शक व स्वच्छ कारभार आणि शेणा-मुतात राबणाऱ्या माता-भगिनींना दीपावलीला सोन्याने मढवीने, पशुखाद्यासह पशुवैद्यकीय व इतर सेवा दर्जेदाररीत्या पुरविणे, गोकुळ दूध संघाची प्रतिदिन संकलन क्षमता २० लाख लिटर करणे हा आमचा निर्धार असेल, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले
चौकट 1)
मंडलिक - मुश्रींफात भांडण लावण्याचा उद्योग.... वीरेंद्र मंडलिक यांची ‘आम्हाला ठरवून पाडले आहे’ या आशयाची फेसबुक पोस्ट फिरत असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर भय्या माने म्हणाले, आमच्या आघाडीच्या चार उमेदवारांचा पराभव झालेला आहे. त्याची सखोल चौकशी करून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ केले जाईल. त्याबाबत योग्य तो निर्णय नेत्यांनी घ्यावा. काहीजण मुश्रीफ व मंडलिक गटात भांडणे लावण्याचा उद्योग जाणीवपूर्वक करीत आहेत. परंतु, अशा गोष्टींवरून आमच्यात भांडण होणार नाही अशी पुष्टी मंत्री मुश्रीफ यांनीही यावेळी दिली.
नवीद मुश्रीफांचे कौतुक
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ही निवडणूक सुरू असताना नवीदच्या पत्नीसह त्याची दोन्ही मुलेही कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तसेच माझी दुसरी सूनही पॉझिटिव्ह होती. त्यांच्यावर कोल्हापुरात खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. अशा परिस्थितीत नवीद हे प्रचारात सक्रिय होते. आम्ही आमचे दुःख आणि वेदना जनतेला जाणवूसुद्धा दिल्या नाहीत.
● कृपया मंत्री मुश्रीफ यांचा सिंगल फोटो वापरावा ही विनंती.