जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई भासणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:26 AM2021-03-23T04:26:45+5:302021-03-23T04:26:45+5:30

जयसिंगपूर : प्रत्येकवर्षी एप्रिल व मे महिन्याोमध्ये प्रचंड उन्हाळ्यामुळे नद्यांमधील पाण्याची आवक कमी तर उपशाचे प्रमाण अधिक असल्यामुळे कृष्णा, ...

There will be no water shortage in the district this year | जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई भासणार नाही

जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई भासणार नाही

Next

जयसिंगपूर : प्रत्येकवर्षी एप्रिल व मे महिन्याोमध्ये प्रचंड उन्हाळ्यामुळे नद्यांमधील पाण्याची आवक कमी तर उपशाचे प्रमाण अधिक असल्यामुळे कृष्णा, वारणा या नद्यांची पात्रे कोरडी पडतात. परिणामी शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. या पार्श्वभूमीवर आतापासूनच योग्य नियोजन करावे आणि नदीपात्रामध्ये सातत्याने पाणी रहावे यासाठीची व्यवस्था करावी, असे आदेश पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

यावर्षी मार्च महिन्यात १४ ते १८ मार्च दरम्यान वारणा धरणावरील विद्युत निर्मिती केंद्रात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामानिमित्त वारणा धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद होता. त्यामुळे वारणा नदीपात्र अतिशय कोरडे झाले होते. अनेक गावातील नळपाणी पुरवठा योजना सुद्धा बंद होत्याॉ पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेनंतर नुकतेच वारणा धरणांमधून १५९२ क्युसेस वारणा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळेच वारणा नदीकाठावरील नागरिकांना याचा लाभ होईल, असेही यड्रावकर यांनी सांगितले.

Web Title: There will be no water shortage in the district this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.