ऊस वजनकाट्यात पारदर्शकता येणार, पुढील हंगामापासून साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 12:47 PM2023-02-11T12:47:39+5:302023-02-11T12:48:06+5:30

साखर कारखान्यामध्ये ऊस वजनकाट्यात सर्रास काटामारी

There will be transparency in sugarcane weighing, sugar factory weighing online from next season | ऊस वजनकाट्यात पारदर्शकता येणार, पुढील हंगामापासून साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाइन

ऊस वजनकाट्यात पारदर्शकता येणार, पुढील हंगामापासून साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाइन

googlenewsNext

कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या पुढील हंगामापासून उसाचे वजन करणारे काटे ऑनलाइन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासमवेत साखर आयुक्त गायकवाड यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

साखर कारखान्यामध्ये ऊस वजनकाट्यात सर्रास काटामारी करत आहेत. अनेक साखर कारखान्यांच्या वजनामध्ये घट आले असल्याचे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सरासरी ६०० किलोपासून ते अडीच टनापर्यंत काटामारी होत असल्याचे आढळून येत आहे. याबाबत गेल्या वर्षभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत २९ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाइन करण्याबाबत वजनकाटे महानिरीक्षक यांना निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, असे शेट्टी यांनी मागणी केली.

ऑनलाइन काट्यामुळे पारदर्शकता येणार

ऊस गाडी वजनास आल्यानंतर वजन शेतकरी, साखर कारखाना व साखर आयुक्त यांना कळावे व काट्यात कारखान्याने छेडछाड केली तर तातडीने साखर आयुक्तांना कळते, अशी व्यवस्था या प्रणालीमध्ये आहे. पुढील आठवड्यापर्यंत सदर प्रणालीचा प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयाकडून तयार करून वजन मापे महानियंत्रक यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: There will be transparency in sugarcane weighing, sugar factory weighing online from next season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.