भविष्यात आयलीग स्पर्धेतही महिला संघ दिसेल : मधुरिमाराजे ,कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:56 PM2017-11-24T23:56:57+5:302017-11-25T00:12:14+5:30

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य असल्याने येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर ‘आयलीग’सारख्या स्पर्धेत कोल्हापूरचाही संघ दिसेल,

There will be a women's team in the future Eliag tournament: Madhurimaraje, Kolhapur, women's national and international level skills in men's football | भविष्यात आयलीग स्पर्धेतही महिला संघ दिसेल : मधुरिमाराजे ,कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य

भविष्यात आयलीग स्पर्धेतही महिला संघ दिसेल : मधुरिमाराजे ,कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य

Next
ठळक मुद्दे‘खेलोगे तो खिलोगे’ या योजनेतून कोल्हापूरच्या प्रणाली चव्हाण हिला केवळ फुटबॉल खेळण्यासाठीची राष्ट्रीय स्तरावरील ५० हजारांची शिष्यवृत्ती मिळाली मुलींना फुटबॉलमुळे रेल्वे, पोलीस, लष्कर, आदींसह केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरीच्याही संधी उपलब्ध

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य असल्याने येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर ‘आयलीग’सारख्या स्पर्धेत कोल्हापूरचाही संघ दिसेल, असा विश्वास वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमाराजे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

आज, शनिवारपासून शाहू स्टेडियमवर होणाºया इंडियन वुमेन्स लीग पात्रता फेरीच्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या.संस्थानकाळापासून सुरू असणाºया फुटबॉलमध्ये १९९५ पासून महिला फुटबॉलचीही बीजे कोल्हापुरात शाहू छत्रपती यांनी रोवली. त्यावेळी दोन संघ होते. त्यांचे आता १९ संघ निर्माण झाले आहेत.

त्यातून मृदल शिंदे, ऐश्वर्या हवालदार, सुचेता पाटील, पृथ्वी गायकवाड, प्रणाली चव्हाण, रचना पाटील, प्रतीक्षा मिठारी, आदी राष्ट्रीय खेळाडू मिळाले आहेत. महिलांची संघनिर्मिती व्हावी, याकरिता कोल्हापुरातील आघाडीच्या फुटबॉल क्लब, तालीम संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक बनले आहे. याकरिता मुलींचाही खुला संघ निर्माण व्हावा.

जेणेकरून कोल्हापुरातूनही राष्ट्रीय पातळीवरील ‘आयलीग’सारख्या स्पर्धेत या मुली कोल्हापूरचे नाव करतील. ज्याप्रमाणे के. एस. ए. वरिष्ठ लीग ए ते बी, सी, डी, ई अशा पातळ्यांवर संघनोंदणी करतात, त्याप्रमाणे मुलींच्याही संघांची नोंदणी के. एस. ए. च्या माध्यमातून व्हावी. जेणेकरून ‘विफा’ व्हाया ‘आॅल इंडिया फुटबॉल महासंघा’कडे केवळ ‘कोल्हापूरचे संघ’ म्हणून नोंदणी होईल आणि आपल्या कोल्हापूरच्या मुली देशभरात या फुटबॉलनगरीचा डंका वाजवतील.

मुलींना फुटबॉलमुळे रेल्वे, पोलीस, लष्कर, आदींसह केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरीच्याही संधी उपलब्ध आहेत. येत्या काळात कोल्हापुरात ‘एआयएफएफ’च्या माध्यमातून ‘बेबी लीग’सारख्या स्पर्धाही आयोजित केल्या जाणार आहेत. त्यातून वय वर्षे ८ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या या स्पर्धा होतील. त्याकरिता कोल्हापूरचाही संघ यात असेल.

कोल्हापूरच्या अनेक मुलींनी फुटबॉलच्या तंत्रशुद्ध खेळाच्या प्रशिक्षणाबरोबरच ‘विफा’च्या ग्रासरूटमध्येही प्रशिक्षण घेतले आहे. त्यानुसार मृदल, ऐश्वर्या या पंच म्हणूनही काम करीत आहेत. केवळ कोल्हापुरात नोंदणीकृत संघ नसल्याने आपल्या पाच मुली बडोदा संघातून खेळत आहेत. विशेष म्हणजे १९ शाळांच्या संघातीलच मुली पुढे विद्यापीठ आणि खुल्या चाचणी स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय स्पर्धा गाजवित आहेत.

‘खेलोगे तो खिलोगे’ या योजनेतून कोल्हापूरच्या प्रणाली चव्हाण हिला केवळ फुटबॉल खेळण्यासाठीची राष्ट्रीय स्तरावरील ५० हजारांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. यासह कोल्हापूरच्या अनिकेत जाधवने तर युवा विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातून आघाडीचे स्थान पटकावून या नगरीचा डंका संपूर्ण देशासह परदेशांतही केला आहे. भारतीय महिला व पुरुष फुटबॉल संघात मणिपूरच्या मुली व मुलांचा भरणा जवळजवळ संघांच्या निम्मा असतो. त्याला कारण म्हणजे तेथे कोल्हापूरसारखा घराघरांत फुटबॉल आहे. फरक फक्त एकच आहे की, तेथील पालक, संस्थांनी आपल्या मुलींकरिता संघनोंदणी केली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्याही तालीम, फुटबॉल क्लबनी जर अशी संघनोंदणी केली, तर भविष्यात कोल्हापूरच्या महिलांचीही टीम इंडियन आयलीग फुटबॉल स्पर्धेत निश्चित दिसेल.

आघाडीच्या क्लबनी पुढाकार घ्यावा
संस्थानकाळापासून सुरू असणाºया फुटबॉलमध्ये १९९५ पासून महिला फुटबॉलचीही बीजे कोल्हापुरात शाहू छत्रपती यांनी रोवली. त्यावेळी दोन संघ होते. त्यांचे आता १९ संघ निर्माण झाले आहेत. त्यातून मृदल शिंदे, ऐश्वर्या हवालदार, सुचेता पाटील, पृथ्वी गायकवाड, प्रणाली चव्हाण, रचना पाटील, प्रतीक्षा मिठारी, आदी राष्ट्रीय खेळाडू मिळाले आहेत. महिलांची संघनिर्मिती व्हावी, याकरिता कोल्हापुरातील आघाडीच्या फुटबॉल क्लब, तालीम संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक बनले आहे.

 

Web Title: There will be a women's team in the future Eliag tournament: Madhurimaraje, Kolhapur, women's national and international level skills in men's football

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.