हॉटेलमध्ये घुसून दोघांवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:25+5:302020-12-17T04:49:25+5:30
नऊजणांवर गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : हॉटेलमध्ये जेवण देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून नऊजणांनी हॉटेलची तोडफोड करत दोघांवर ...
नऊजणांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : हॉटेलमध्ये जेवण देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून नऊजणांनी हॉटेलची तोडफोड करत दोघांवर चाकूहल्ला केला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नऊजणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत अक्षय म्हादगोंडा पाटील (वय २५, रा. कबनूर) यांनी तक्रार दिली आहे.
विकास सुभाष पाटील व सूरज नागोंडा पाटील (दोघे रा. दत्तनगर, कबनूर) अशी जखमींची नावे आहेत. तर आफ्रिदी लियाकत बागवान (२३, रा. भोनेमाळ), मुसबिर इबादुल्ला बागवान (२५, रा. वेताळपेठ), सुखमुनी इराण्णा बद्रे (२१), संदीप दिलीप पाडळकर (२६), मनोज तुकाराम हसबे (२३, तिघे रा. गुरूकन्नननगर), किरण राजू गांजवे (२४, रा. लक्ष्मी माळ, कबनूर), स्वप्निल चिन्नाप्पा केटकाळे (३५, रा. पंचगंगा फॅक्टरी रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कबनूर-रूई मार्गावर असलेल्या हॉटेल गुडलक येथे मंगळवारी रात्री वरील संशयित जेवणासाठी गेले होते. त्यावेळी हॉटेल बंद आहे. जेवण मिळणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे संशयितांनी हॉटेलच्या शटरवर लाथा मारत तेथील रिकाम्या बाटल्या व ग्लास फोडले. त्यावेळी अक्षय पाटील यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वांनी त्यांना धक्काबुक्की करत हॉटेलमध्ये घुसले.
दरम्यान, आफ्रिदी बागवान याने तुम्हाला जिवंत सोडत नाही, असे म्हणत विकास पाटील याच्या डाव्या बाजूस चाकूने भोकसले. ते पाहून मदतीसाठी आलेल्या सूरज पाटील यालाही बागवान याने पोटावर चाकू मारून जखमी केले. याप्रकरणी नऊजणांवर गुन्हा दाखल केला असून, आठजणांना अटक केली आहे.