ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे मोबाईल चोरट्यांना सोयीचे ठरतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:08+5:302021-08-14T04:28:08+5:30
कोल्हापूरमध्ये महागडे आणि मोठ्या आकाराचे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शहरातील विविध भाजी मंडई, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक, आदी ...
कोल्हापूरमध्ये महागडे आणि मोठ्या आकाराचे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शहरातील विविध भाजी मंडई, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक, आदी गर्दीच्या ठिकाणी अनेकजण वावरत असतात. युवक, पुरुष हे मोबाईल हातात, काहीजण शर्ट, पँटच्या खिशामध्ये, तर महिला आपल्या हातात, पर्समध्ये किंवा सोबत असलेल्या छोट्या बॅगमध्ये ठेवतात. गडबडीच्यावेळी अनेकदा मोबाईल नीट ठेवला जात नाही. आकाराने मोठा असलेला मोबाईल नीट ठेवणे आवश्यक असते, पण नागरिकांकडून नेमके तेच घडत नसल्याने काहीशा बेजबाबदारपणामुळे मोबाईल चोरट्यांचे फावत आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये शहरातून सुमारे १५११ मोबाईल चोरी अथवा गहाळ झाले असून त्यातील ३५७ मोबाईलचा शोध लागला आहे. योग्य स्वरूपातील दक्षता घेतल्यास आणि सावधगिरी बाळगल्यास मोबाईलची चोरी आणि त्यामुळे होणारा मानसिक त्रास आणि आर्थिक फटका टाळता येणे शक्य आहे.
पॉईंटर
शहरातील मोबाईल चोरीच्या घटना
सन २०१९ : ६७८
सन २०२० : ६१०
सन २०२१ (जूनपर्यंत) : २२३
चौकट
चोरी नव्हे, गहाळ म्हणा
मोबाईल चोरीला गेल्यानंतर काहीजण पोलीस ठाण्यात तक्रार देतात. त्याठिकाणी अनेकदा गहाळ रजिस्टरला नोंद करून तक्रारदाराला दाखला दिला जातो. दरम्यान, चोरीला जाणारे मोबाईल शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करते. मात्र, त्यासाठी अधिक वेळ खर्च होतो. मोबाईल चोरणाऱ्याला पकडताना तांत्रिक अडचणी अधिक येतात. त्यामुळे चोरट्याला शोधण्यासाठी जादा वेळ लागतो. गेल्या अडीच वर्षांत पोलिसांनी केलेल्या तपासातून ३५७ जणांना त्यांचे मोबाईल परत मिळाले आहेत. अन्य मोबाईलचा शोध लावण्यासाठी तपास सुरू आहे.
चौकट
या भागांत मोबाईल सांभाळ
कोल्हापूर शहरातील श्री अंबाबाई मंदिर परिसर, लक्ष्मीपुरी आणि कपिलतीर्थ भाजी मंडई, महाद्वार रोड, रेल्वे फाटक भाजीमंडई या गर्दी असलेल्या भागांत वारंवार मोबाईल चोरीचे प्रकार घडतात. त्यामुळे संबंधित भागात गेल्यानंतर नागरिकांनी मोबाईल सांभाळणे आवश्यक आहे.
130821\13kol_2_13082021_5.jpg
डमी (१३०८२०२१-कोल-१०४६ डमी)