पोलिसांची सतर्कता! कोल्हापुरात ज्वेलर्समध्ये चोरी करताना चोरटे रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 03:37 PM2024-05-30T15:37:28+5:302024-05-30T15:37:45+5:30

कोल्हापूर : आर. के. नगर चौकातील साई मंदिराच्या मागे महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांंना करवीर पोलिसांनी प्रसंगावधान ...

Thieves arrested while stealing from jewelers in Kolhapur | पोलिसांची सतर्कता! कोल्हापुरात ज्वेलर्समध्ये चोरी करताना चोरटे रंगेहाथ अटक

पोलिसांची सतर्कता! कोल्हापुरात ज्वेलर्समध्ये चोरी करताना चोरटे रंगेहाथ अटक

कोल्हापूर : आर. के. नगर चौकातील साई मंदिराच्या मागे महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांंना करवीर पोलिसांनी प्रसंगावधान राखून मंगळवारी मध्यरात्री रंगेहाथ पकडले. रविराज महेश कसबेकर (वय २७), अरुण मल्लाप्पा शिंदे (४६, दोघेही रा. टेंबलाई नाका झोपडपट्टी ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून लोखंडी सळई, लोखंडी चिमटा जप्त केला आहे. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणी सराफ व्यावसायिक महादेव शंकरराव गायकवाड (६६, रा. उभा मारुती चौक, शिवाजी पेठ, कोल्हापूर ) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घरफोडी रोखण्यासाठी रात्रगस्त वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथक गेले चार महिने रात्र गस्त सुरू आहे. मंगळवारी पहाटे आर. के. नगर चौक, साई मंदिरच्या मागे व्यापारी संकुल गाळा क्रमांक ३६ येथील महालक्ष्मी ज्वेलर्स येथे पथकाला काही संशयास्पद हालचाली दिसल्या. 

त्यावेळी रविराज कसबेकर आणि अरुण शिंदे हे दोघे लोखंडी सळई आणि लोखंडी चिमट्याने दुकानाचे उत्तर आणि पूर्वेकडील शटर तोडत असल्याचे निदर्शनास आले. या चोरट्यांनी गाळ्याचे शटर उचकटून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे काढले होते. हा प्रकार सुरू असतानाच गस्तीच्या पथकाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून ताब्यात घेतले. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक इनामदार, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सुमित्र पवार, विष्णू केंद्रे, गणपत पवार आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Thieves arrested while stealing from jewelers in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.