आंदोलनस्थळी चोरट्यांनी केले हात साफ, चौघे संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:17 PM2021-06-16T17:17:31+5:302021-06-16T17:19:53+5:30
Maratha Reservation Crimenews Police Kolhapur : मराठा आरक्षण मूक आंदोलनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, तेथे भुरट्या चोरट्यांचाही मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट दिसून आला. या गर्दीत कार्यर्त्यांच्या खिशातील पाकीट मारणारे व सोन्याच्या चेनला हिसडा मारणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती. या चोऱ्या करण्यासाठी करमाळा (जि. सोलापूर) येथूनही भुरट्या चोऱ्या करणारी टोळी आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
कोल्हापूर : मराठा आरक्षण मूक आंदोलनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, तेथे भुरट्या चोरट्यांचाही मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट दिसून आला. या गर्दीत कार्यर्त्यांच्या खिशातील पाकीट मारणारे व सोन्याच्या चेनला हिसडा मारणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती. या चोऱ्या करण्यासाठी करमाळा (जि. सोलापूर) येथूनही भुरट्या चोऱ्या करणारी टोळी आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
मराठा समाज आरक्षण आंदोलनासाठी राज्यातून निमंत्रितांना बोलावले होते. या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातील ऐतिहासिक नर्सरी बागेतून होणार असल्याने तेथे मोठी गर्दी होणार, हे अपेक्षितच होते. हाच फायदा घेत परजिल्ह्यातील पाकीटमार चोरट्यांनी या आंदोलनाकडे लक्ष वेधले. या चोरट्यांनी आंदोलनस्थळी झालेल्या गर्दीचा फायदा उठवत काही कार्यकर्त्यांच्या खिशातील पैशाची पाकिटे चोरली तसेच काहींच्या गळ्यातील सोन्याच्या चेनचीही चोरी झाली.
या चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी साध्या गणवेशातील पोलीस गर्दीत सोडले. त्यावेळी पैशाचे पाकीट तसेच सोन्याची चेन चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस तसेच लक्ष्मीपुरी पोलिसांनी पकडले. यामुळे ही चोरट्यांची टोळी हात साफ करण्यासाठी आली असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी परिसरातील काही लॉजचीही तपासणी केली, त्यावेळी करमाळा (जि. सोलापूर) येथील चार संशयित युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या चारही संशयितांकडे सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस अधिकारी चौकशी करत होते.