स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी बनला चोर

By admin | Published: May 8, 2016 12:41 AM2016-05-08T00:41:35+5:302016-05-08T00:41:35+5:30

दीड लाखाचा माल जप्त : कोल्हापूरसह कऱ्हाड, पुण्यात चोऱ्या; संशयित उदगिरीचा

Thieves made for competition test books | स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी बनला चोर

स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी बनला चोर

Next

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करण्यासाठी पैशांची चणचण भासू लागल्याने कंपन्यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जेम्स स्टोन परिसरात शनिवारी अटक केली. शादाप रज्जाक पटेल (वय २१, रा. उदगिरी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, परकीय चलन, कॅमेरा, टॅब असा सुमारे एक लाख ४७ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पटेलने कोल्हापूरसह कऱ्हाड, पुणे या ठिकाणी अशा आतापर्यंत आठ चोऱ्या केल्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
चौधरी म्हणाले, जेम्स स्टोन परिसरात एकजण मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. शनिवारी दुपारी तो तेथून येत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात आणले. त्याने शादाप रज्जाक पटेल असे नाव सांगितले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने जानेवारी २०१६ मध्ये शाहूपुरीतील स्टर्लिंग टॉवर, राजाराम रोडवरील एम. जे. प्लाझा येथील एका कार्यालयात, स्टेशन रोडवरील प्रभाकर प्लाझा,
पाच बंगला, शाहूपुरी परिसरात रॉयल प्लाझा व दसरा चौकातील व्हाईट हाऊस या ठिकाणी, तर गांधीनगर (ता. करवीर) येथे फर्निचरच्या दुकानामध्ये तसेच स्टर्लिंग टॉवरमधील कार्यालयातून परकीय चलन चोरले असल्याची कबुली दिली. ही
कारवाई गुन्हेशोध पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल संजय जाधव, अमर आडूळकर, समीर मुल्ला, विशाल बंद्रे, प्रशांत पांडव, अरविंद पाटील, ओंकार परब, सागर माळवे, रमजान इनामदार, धनंजय परब, आदींनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Thieves made for competition test books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.