शेकापच्या विचारांचा माझ्यावर पगडा

By Admin | Published: August 5, 2015 12:06 AM2015-08-05T00:06:42+5:302015-08-05T00:06:42+5:30

उल्हास पाटील : शेतकरी कामगार पक्षाचा ६८वा वर्धापन दिन

Think of Peacock's thoughts to me | शेकापच्या विचारांचा माझ्यावर पगडा

शेकापच्या विचारांचा माझ्यावर पगडा

googlenewsNext

कुरूंदवाड : भारतीय शेतकरी कामगार पक्षाची तत्त्वे आजही तळागाळातील नागरिकांत रुजली आहेत. शेतमजूर गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरणारा पक्ष अशी त्यांची ख्याती आहे. मी शिवसेनेचा आमदार असलो तरी शेकापच्या विचारांचा पगडा माझ्यावर आहे, असे प्रतिपादन आमदार उल्हास पाटील यांनी केले.शेतकरी कामगार पक्षाच्या ६८व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष पाटील, शंकरराव इटाज, पुरोगामी युवक संघटनेचे सचिव अजित देसाई, पांडुरंग माने, अहमद मतवाल, माजी उपनगराध्यक्ष आनंदराव लांडगे, आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष वैभव उगळे, रामचंद्र मोहिते, आबा बागडी, प्रा. भाऊसाहेब सावगावे, विलास पाटील, बापूसो गावडे, बांधकाम सभापती सुरेश कडाळे, माजी नगराध्यक्ष संजय खोत, भाऊसिंग रजपूत, विश्राम कोळी, डॉ. विकास पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, प्रा. सुनील चव्हाण, विजय पाटील, विष्णूपंत माळी आदीसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अजित देसाई यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संदीप सावगावे यांनी केले.

Web Title: Think of Peacock's thoughts to me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.