तिसऱ्या दिवशी देवीचे मुखकमल किरणांनी उजळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 04:54 AM2019-11-11T04:54:50+5:302019-11-11T04:55:06+5:30
दक्षिणायनाच्या पहिल्या किरणोत्सवाच्या तिस-या दिवशी रविवारी, मावळतीची सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या मुखकमलांना स्पर्श करून डावीकडे लुप्त झाली.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दक्षिणायनाच्या पहिल्या किरणोत्सवाच्या तिस-या दिवशी रविवारी, मावळतीची सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या मुखकमलांना स्पर्श करून डावीकडे लुप्त झाली. त्यामुळे अंबाबाई देवीचा किरणोत्सव पूर्ण झाल्याचे मानले जाते.
रविवारी पाच वाजून ३६ मिनिटांनी सुर्यकिरणे मंदिराच्या पितळी उंबरठ्यावर पोहोचली. पाच वाजून ४० मिनिटांनी ती गारेच्या पायरीवर पोहोचली. त्यानंतर दुसºया पायरीवर ती पाच वाजून ४२ मिनिटांनी पोहोचली. तिसºया पायरीवर किरणे पाच वाजून ४३ मिनिटांनी पोहोचली. पाच वाजून ४४ मिनिटांनी ती कटांजली, तर पाच वाजून ४५ मिनिटांनी कमरेपर्यंत व पाच वाजून ४६ मिनिटांनी गळ्यापर्यंत पोहोचली. किरणांची तीव्रता कमी होत असतानाच अचानकपणे किरणांनी देवीच्या मुखकमलापर्यंत पोहोचून डावीकडे लुप्त होणे पसंत केले. चरणस्पर्श ते मुखकमल असा किरणांचा प्रवास झाल्यानंतर किरणोत्सव पूर्ण झाल्याचे मानले जाते. याला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व खगोलशास्त्रीय अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दुजोरा दिला.
करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या किरणोत्सवाच्या तिसºया दिवशी रविवारी मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीच्या मुखकमलाला स्पर्श करीत दक्षिणायनातील पहिला किरणोत्सव सोहळा पूर्ण केला.
>किरणोत्सव मार्गातील अडथळे यापूर्वीच दूर केल्याने स्वच्छ किरणे देवीच्या गाभाºयात पोहोचली आणि किरणोत्सव पूर्ण झाला.
- महेश जाधव, अध्यक्ष,
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती