पन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:18+5:302020-12-27T04:18:18+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात केली. नव्या कृषी ...

The third day of Kisan Atmanirbhar Yatra started from Panhala | पन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात

पन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात

Next

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात केली. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने ही शेतकऱ्यांची नसून मूठभर दलालांची आहेत. महाराष्ट्रातील काही नेते शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत चुकीची माहिती देत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, येथील शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा भ्रमनिरास झाल्याचे पन्हाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारने जुनी व्यवस्था मोडित काढुन शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदा करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याच्या समर्थनार्थ किसान आत्मनिर्भर यात्रा शुक्रवारी पन्हाळा येथे मुक्कामी होती. शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांच्या पादुकांना वंदन करून यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर तेथेच पायथ्याशी असलेल्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व तेथील लोकांची या विधेयकाबद्दलची मतं जाणून घेतली. दलालांच्या जोखडातून मुक्त करणारेच शेतकरी हिताचे कायदे मोदी सरकारने आणले आहेत, केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना व भारतीय जनता किसान मोर्चा यांनी किसान आत्मनिर्भर यात्रेचे आयोजन केल्याचे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगितले. आ. पडळकर म्हणाले, नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या बांधावरच योग्य दर मिळणार आहे. शेतकरी आपल्या मालाची कोठेही विक्री करू शकणार आहेत.

यावेळी भगवान काटे, अमरसिंह भोसले, अविनाश चरणकर, सचिन शिपुगडे, नगराध्यक्षा रूपाली धडेल, आदी उपस्थित होते.

फोटो

पन्हाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पाडळकर, सोबत नगराध्यक्षा रूपाली धडेल, भगवान काटे व मान्यवरांनी दर्शन घेतले.

Web Title: The third day of Kisan Atmanirbhar Yatra started from Panhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.