सोशल डिस्टन्स ठेवून , स्वच्छता मोहिमेत तीन टन कचरा उठाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 06:36 PM2020-05-24T18:36:33+5:302020-05-24T18:38:58+5:30
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने रविवारी शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सहभाग घेतला.
कोल्हापूर : ह्यकोविड १९ह्ण संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरांवर उपाययोजना सुरू आहेत. या अंतर्गत रविवारी शहरातील नालेस्वच्छता व औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा हा ५६वा रविवार असून, या अभियानामध्ये महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून सहभाग नोंदविला.
आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, गायकवाडवाडा येथील छत्रपती राजाराम महाराज समाधिस्थळ, यादवनगर, जयंती पंपिंग स्टेशन, पंचगंगा नदीघाट, रिलायन्स मॉलमागे, गांधी मैदान, रंकाळा तलाव परिसर, शास्त्रीनगर या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत चार जेसीबी, पाच डंपर, सहा आरसी गाड्या, पाण्याचा एक टँकर व एका ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्यात आली. यात महापालिकेचे ७० स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले.
यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजनेचा भाग म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राजे संभाजी कॉलनी, राजोपाध्येनगर येथे औषध फवारणी करण्यात आली. याप्रसंगी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक मनोज लोट, स्वप्निल उलपे, शिवाजी शिंदे, अरविंद कांबळे, ऋषीकेश सरनाईक, शुभांगी पोवार, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर, अमित देशपांडे उपस्थित होते.