कोल्हापुरात कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 07:16 PM2020-11-30T19:16:22+5:302020-11-30T19:18:41+5:30
coronavirus, kovid, kolhapurnews, cprhospital कोरोनावरील कोव्हॅक्सिन लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला परवानगी देण्यात आली आहे.
कोल्हापूर : कोरोनावरील कोव्हॅक्सिन लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला परवानगी देण्यात आली आहे.
या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील २५ हजार ५०० स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि गोवा येथे या चाचण्या करण्यासाठी क्रोम क्लिनिकल रिसर्च ॲन्ड मेडिकल टुरिझम या संस्थेला परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत २५० स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेची गुणवत्ता पाहून या चाचण्या करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
या चाचण्यांच्या कालावधीत स्वयंसेवकांचा विमा उतरविण्यात येणार आहे. त्यामुळे जरी एखाद्या स्वयंसेवकाला कोरोना झाला किंवा अन्य वैद्यकीय अडचणी आल्या तरी त्याचा खर्च या संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत या चाचण्या सुरू झाल्याचे सांगण्यात आले.