‘गोकुळ’साठी तेरा हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:45+5:302021-02-23T04:38:45+5:30
कोल्हापूर : गोकुळच्या प्रारूप यादीवर सोमवारी मयत ठराव बदलण्याबाबतचे पाच, तर इतर आठ अशा तेरा हरकती दाखल झाल्या. ...
कोल्हापूर : गोकुळच्या प्रारूप यादीवर सोमवारी मयत ठराव बदलण्याबाबतचे पाच, तर इतर आठ अशा तेरा हरकती दाखल झाल्या. आतापर्यंत २२ मयत व्यक्तींचे ठराव बदलण्याची मागणी संबंधित संस्थांनी सहायक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे केली आहे.
‘गोकुळ’च्या प्रारूप यादीवर हरकती घेतल्या जात आहेत. बुधवार (दि. २४) पर्यंत यादीवर हरकत घेता येणार आहे. आतापर्यंत ३६ हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये मयत ठरावधारकाचे नाव बदलण्याबाबतच्या २२, तर इतर चौदा हरकती आहेत. दुबार ठरावांवर २ व ३ मार्चला विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्या समोर सुनावणी होणार आहे, तर इतर हरकतींवर ४ मार्चला सुनावणी घेणार आहेत. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
पन्हाळ्यातील ‘त्या’ आठ संस्थांची हरकत
‘गोकुळ’ने सभासदत्व नाकारलेल्या पन्हाळा तालुक्यातील संस्थांनी विभागीय उपनिबंधकांकडे दाद मागितली होती. त्यांचे सभासदत्व कायम ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र, ‘गोकुळ’ने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, त्याला स्थगिती मिळाल्याचे समजते.