निपाणीत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:06+5:302021-05-04T04:11:06+5:30
निपाणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने निपाणी शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. पण नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी ...
निपाणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने निपाणी शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. पण नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत किराणा दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वेळेत बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बाजाराला येणाऱ्या नागरिकांमुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा होत असून कोरोनाचा धोका वाढत आहे.
निपाणी शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी प्रशासन सर्व पातळीवर कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कर्नाटक शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची निपाणी तालुक्यात अंमलबजावणी होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तालुका प्रशासनाने सकाळी सहा ते दहा या वेळेत नागरिकांना खरेदी करण्याची मुभा दिली आहे. पण या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच नाही, तर अन्य दुकानेही उघडी ठेवण्यात येत आहेत. याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहरात बाजारासाठी गर्दी करत आहेत.
यामुळे बाजाराला यात्रेचे स्वरूप आले आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडत असून सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा होत आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिक मास्कही वापरताना दिसत नाहीत. यामुळे कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळणे महत्त्वाचे आहे.
०३ निपाणी
फोटो
निपाणी बाजारात गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.