दुष्काळात तेरावा; महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोतर शिष्यवृत्तीचे अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:46+5:302021-06-30T04:15:46+5:30

कोल्हापूर : पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागातर्फे मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. मात्र, कोरोनामुळे सलग दुसऱ्या ...

Thirteenth in famine; Post-matric scholarship application stuck in colleges! | दुष्काळात तेरावा; महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोतर शिष्यवृत्तीचे अर्ज !

दुष्काळात तेरावा; महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोतर शिष्यवृत्तीचे अर्ज !

Next

कोल्हापूर : पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागातर्फे मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. मात्र, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी महाविद्यालयांमधील वर्ग प्रत्यक्षात भरलेले नाहीत. त्यामुळे या शिष्यवृत्तीचे कोल्हापूर जिल्ह्यातील १८११ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडे अडकले आहेत.

पारंपरिक अभ्यासक्रमांसह व्यवस्थापन, फार्मसी, पॉलिटेक्निक, कलानिकेतन आदी विविध महाविद्यालयांतील इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आणि अनुसूचित जाती (एससी) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीची रक्कम अभ्यासक्रमाच्या शुल्कनिहाय आहे. या शिष्यवृत्तीसाठी यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ४४,२४२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या अर्जांची छाननी करून ते समाजकल्याण कार्यालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया महाविद्यालयांकडून होते. सध्या एकूण १८११ अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी समाजकल्याण विभागाचा महाविद्यालयांकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. तांत्रिक स्वरूपातील त्रुटींमुळे ३५७९ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडून नाकारण्यात आले आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना या त्रुटींची पूर्तता करण्यात अडचण येत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

पॉंईटर

एससी प्रवर्गातील किती अर्ज ऑनलाईन सादर : १८,३१९

समाजकल्याण विभागाने निकाली काढले : १४,०९१

महाविद्यालयात प्रलंबित : ९७४

व्हीजेएनटी प्रवर्गातील किती अर्ज ऑनलाईन सादर : २५,९२३

समाजकल्याण विभागाने निकाली काढले : २०,६००

महाविद्यालयांत प्रलंबित : ८३७

विद्यार्थी गावी अडकले

कोरोनामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आम्हा विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. ते लक्षात घेऊन राज्य शासनाने अर्जांतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ द्यावी.

-प्रशांत आंबी

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शुल्कात शिक्षण संस्थांनी कोणतीही सवलत दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठ आणि समाजकल्याण विभागाने समन्वय साधून प्रलंबित अर्जांची लवकर पूर्तता करावी.

-आरती रेडेकर

प्रतिक्रिया

महाविद्यालयांकडून आतापर्यंत जितके अर्ज आमच्याकडे ऑनलाईन पध्दतीने आले आहेत. ते सर्व मंजूर केले आहेत. प्रलंबित अर्जांबाबत देखील आमचा पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबत साधारणत: दहावेळा महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून समाजकल्याण विभागाने विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी सातवेळा मुदतवाढ दिली आहे.

-विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग

अन्य आकडेवारी दृष्टिक्षेपात

या शिष्यवृत्तीसाठी दाखल झालेले एकूण अर्ज : ४४२४२

महाविद्यालयांनी मंजूर केलेले अर्ज : ३५०९२

समाजकल्याण विभागाने मंजूर केलेले अर्ज : ३४६९१

===Photopath===

290621\29kol_1_29062021_5.jpg

===Caption===

डमी (२९०६२०२१-कोल-स्टार ८५८ डमी)

Web Title: Thirteenth in famine; Post-matric scholarship application stuck in colleges!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.